कोरोना व्हायरस साथीच्या रोग पासून वाचण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे ,फुफ्फुस बळकट करणे आणि ऑक्सिजनची पातळी वाढविण्याचे म्हटले जात आहे. कोरोना विषाणू हे घातक आहे या पासून संरक्षण ठेवण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी जाऊ नये. हाच या रोग पासून बचाव आहे. ऑक्सिजन पातळी वाढविण्यासाठी काही योगा टिप्स अवलंबवावे.
कंबर, मान आणि पाठीचा कणा ताठ करून शरीर आणि मनाला स्थिर ठेवा. डोळे मिटून घ्या आणि वेगाने श्वास घ्या आणि बाहेर सोडा. श्वास घेताना पोटाला फुगवून ठेवा आणि सोडताना पिचकवून घ्या. या मुळे नाभी स्थळावर दाब पडतो. हे प्राणायाम सरावाने केवळ 30 सेकंद केले जाऊ शकते.