आयुर्वेद आणि योगाच्या पंचकर्माचे फायदे जाणून घ्या

रविवार, 16 मे 2021 (11:02 IST)
आयुर्वेद निसर्गानुसार जीवन जगण्याचा सल्ला देतो. आयुर्वेदाचा  असा विश्वास आहे की आपले मेंदू हे बहुतेक रोगांच्या जन्माचे स्थान आहे.इच्छा, भावना, द्वेष, क्रोध, लोभ, कर्म या नकारात्मक प्रवृत्तींमुळे अनेक प्रकारचे रोग उद्भवतात.आयुर्वेदानुसार, मानवाच्या शरीरात तीन जैविक घटक असतात ज्याला त्रिदोष म्हणतात. या तीन घटकांचा शरीरात चढ-उतार होतात.यांचे संतुलन मध्ये बिगाड झाल्यावर किंवा कमी जास्त झाल्याने रोग उद्भवतात.
हे तीन दोष आहे वात(वायू घटक),पित्त (अग्नी घटक) आणि कफ.
वाता चे 5 उपभाग है 1- प्राण वात, 2- समान वात, 3- उदान वात, 4- अपान वात आणि  5- व्‍यान वात.
पित्ताचे पण  5 उपभाग है 1- साधक पित्‍त, 2- भ्राजक पित्‍त, 3- रंजक पित्‍त, 4- लोचक पित्‍त आणि  5- पाचक पित्‍त.
अशा प्रकारे कफाचे पण 5 भाग आहे.1- क्‍लेदन कफ, 2- अवलम्‍बन कफ, 3- श्‍लेष्‍मन कफ, 4- रसन कफ आणि  5- स्‍नेहन कफ. 
या सर्वांचे संतुलनात बिगाड आल्यामुळे गंभीर रोग उद्भवतात.अशा वेळी पंचकर्म केल्याने आजार कधीही होत नाही. 
 
* पंचकर्म म्हणजे काय - पंच कर्म किंवा पाच क्रिया ज्यामुळे शरीर निरोगी बनतं.त्याचे मुख्य प्रकार सांगत आहोत परंतु याचे उपप्रकार देखील आहे. ही पंचकर्म क्रिया देखील योगाचा एक भाग आहे.  
 
1 वमन क्रिया -  या मध्ये उलटी करवून शरीराची स्वच्छता केली जाते. शरीरातील साठलेल्या कफाला काढून आहारनलिका आणि पोटाला स्वच्छ केले जाते. 
 
2 विरेचन क्रिया- या क्रियेत शरीराच्या आंतड्याना स्वच्छ केले जाते. सध्या च्या आधुनिक काळात हे कार्य एनिमा लावून केले जाते. पण आयुर्वेदात हे काम नैसर्गिकरित्या केले जाते. 
 
3 निरूहवस्थी क्रिया- याला निरुहा बस्ती देखील म्हणतात. पोटाच्या शुद्धीकरणासाठी, औषधीचे क्वाथ, दूध आणि तेलाचा वापर केला जातो. याला निरुह बस्ती म्हणतात. 
 
4  नास्या: डोकं, डोळे, नाक, कान आणि घश्याच्या आजारांमध्ये नाकाद्वारे केल्या जाणा-या उपचारांना नस्या किंवा शिरोविरेचन  म्हणतात.
 
5 अनुवासनावस्ती - गुदाद्वारात औषधी घालण्याची प्रक्रिया बस्ती कर्म म्हणवली जाते. ज्या मध्ये फक्त तूप,तेल,किंवा इतर स्निग्ध पदार्थ जास्त प्रमाणात वापरले जातात. याला अनुवासन किंवा स्नेहन बस्ती असे म्हणतात. 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती