10 मिनिटांत मन शांत करणारा प्रभावी उपाय

शुक्रवार, 31 ऑक्टोबर 2025 (21:30 IST)
आजच्या धकाधकीच्या आणि तणावाच्या जीवनात मन अशांत असते. दिवसेंदिवस वाढणाऱ्या तणावामुळे अनेक आजार पाठी लागतात. उच्च रक्तदाब, मधुमेह, थॉयराइड सारखे आजार आयुष्याला वेढतात. अशांत मन शांत करण्यासाठी फक्त 10 मिनिटे स्वतःला द्या. 10 मिनिटात मनाला शांत करण्याचे प्रभावी उपाय जाणून घ्या.
ALSO READ: योगा करताना होणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या दुखापतीला टाळण्यासाठी हे उपाय करा
खोल श्वासोच्छ्वास (Deep Breathing):
आरामदायक स्थितीत बसा आणि डोळे बंद करा.
नाक आणि तोंडाने दीर्घ श्वास घ्या, आणि श्वास घेताना तुमचे पोट फुगले पाहिजे.
श्वास सोडताना, पोटातील हवा हळू हळू बाहेर सोडा.
या प्रक्रियेची पुनरावृत्ती करा.
 
सजग ध्यान (Mindful Meditation):
एक शांत जागा निवडा.
डोळे मिटून बसा किंवा उभे रहा आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.
तुमचे लक्ष श्वासाच्या आत-बाहेर जाण्यावर केंद्रित करा.
जेव्हा तुमचे विचार भटकतील, तेव्हा त्यांना हळूवारपणे पुन्हा श्वासावर आणा.
ALSO READ: या लोकांनी कपालभाती करू नये, धोकादायक असू शकते
शांत ठिकाणी फिरा (Walk in a Quiet Place):
10 मिनिटांसाठी शांत ठिकाणी फिरायला जा.
यामुळे तणाव कमी होतो आणि मन शांत होण्यास मदत होते.
 
सकारात्मक विचार (Positive Thinking):
कृतज्ञता व्यक्त करा किंवा आपल्या जीवनातील चांगल्या गोष्टींबद्दल विचार करा.
यामुळे सकारात्मक भावना वाढतात आणि मन शांत होते.
 
 निसर्गात वेळ घालवा:
शक्य असल्यास, बाल्कनी किंवा खिडकीजवळ उभे राहा आणि निसर्गाचे निरीक्षण करा.
बाहेरची शांतता ऐका आणि झाडे, पक्षी किंवा आकाशाकडे लक्ष द्या.
निसर्गाच्या सान्निध्यात थोडा वेळ घालवल्याने मन शांत होते
ALSO READ: आपण रात्री योगा करू शकतो का? जाणून घ्या
 संगीत ऐका:
शांत आणि सुखद संगीत ऐका.
संगीतामुळे तुमच्या भावनांवर सकारात्मक परिणाम होतो आणि तणाव कमी होतो
 
स्ट्रेचिंग करा
जागेवर उभे राहून स्ट्रेचिंग किंवा थोडीशी हालचाल करा.
यामुळे शरीराचा ताण कमी होतो आणि मन ताजेतवाने होते.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By - Priya Dixit

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती