शरद पवार यांना घ्यायला मीच विरोध दर्शवला होता- उद्धव ठाकरे

बुधवार, 8 ऑक्टोबर 2014 (10:43 IST)
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारा यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत घ्याचे होते, परंतु मी स्वत: गोपीनाथ मुंडे यांना विरोध दर्शवला होता, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील जाहीर सभेत केला.

दिल्लीहून अफझल खानाची फौज आली आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता, यावर भाजप नेत्यांनी अफझल खानाच्या मंत्रिमंडळात कसे राहता? असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे म्हणाले, 'मी टोपी फेकलीय, माझ्या फेकलेल्या टोपीत डोकं घालेल तो अफझल खान, तुम्ही का डोके घालता? असा प्रत‍िसवाल उद्धव ठाकरेंनी केला.

संकटसमयी महाराष्ट्रातील शिवसैनिक माझ्यापाठिशी खंबीरपणे उभे राहिले. रक्ताच्या नात्यापेक्षा माझे नाते  शिवसैनिकांशी घट्ट असल्याचे सांगून उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. तुमची दिल्लीची मस्ती दिल्लीत, दिल्लीची मस्ती राज्याचा चालणार नाही, असा शब्दातही उद्धव यांनी भाजपला खडसावले. 

वेबदुनिया वर वाचा