प्रेमाचे 5 देवता, पूजन केल्यास लग्नातील अडथळे होतील दूर

सामान्यात: प्रेमी जोडप्यांच्या लग्न जुळून येत नसल्यामागे ग्रह नक्षत्र जवाबदार असतात परंतू अनेकदा प्रेम संबंधित देवतांची पूजा केल्याने देखील अनुकूल परिणाम मिळू शकतात.
 
कामदेव: काम याचा अर्थ आहे प्रेम, इच्छा आणि कामुकता. देवाचं अर्थ म्हणजे दैवीय किंवा स्वर्गिक. अथर्व वेदामध्ये काम प्रणयसाठी असून यांची तुलना काही लोकं ग्रीक देवता इरोज यांच्याशी करण्यात येते. अनेकदा त्यांना पश्चिमी देशांमध्ये प्रचलित क्यूपिड रूपात बघितलं जातं. कामदेवाचे रूप इच्छा, प्रेम आणि वासना यासाठी जबाबदार आहे. तरुण आणि सुंदर कामदेव प्रभू ब्रह्मा यांचे पुत्र मानले गेले आहेत. त्यांना मनमदन किंवा काम असे म्हटलं जातं.
 
कृष्ण: हिंदू मान्यतेनुसार कृष्ण रास आणि रोमांसचे दैवत आहे. प्रेम आणि काम भावना असल्यास कृष्णाची आराधना केली जाते. राधा-कृष्णाची पूजा केल्याने जीवनात प्रेम टिकून राहतं.
 
रती: प्रेम, इच्छा आणि वासना साठी सुख प्रदान करणार देवी प्रजापती दक्ष यांची पुत्री मानली गेली आहे. देवी प्रभू कामदेव यांची सहायक आहे. स्त्रिया आणि मुली प्रेम आणि शारीरिक संगतीसाठी रतीची पूजा करतात.
 
महादेव: सृष्टीतील सर्वात प्रेमळ जोडपं आहे शिव- पार्वती. सर्वात पहिले प्रेम विवाह त्यांचे झाले असावे. मुली मनपसंत आणि योग्य जीवनसाथीदार मिळवण्यासाठी महादेवाची पूजा करतात. हिंदू धर्मात विवाहासाठी महादेवाला प्रसन्न करण्याची परंपरा आहे. महाशिवरात्री, हरतालिका व्रत आणि सोमवारी मुली व्रत आराधना करून योग्य जोडीदाराचा मिळवा अशी प्रार्थना करतात.
 
चंद्र आणि शुक्र: चंद्राला नेहमीच प्रेमाचं प्रतीक मानले गेले आहे. चंद्रावर प्रेमाचे अनेक रूपक रचवण्यात आले आहे. चंद्राची पूजा केल्याने प्रेमाची कामना पूर्ण होते आणि मनपसंत साथीदार जीवनात येतो. तसेच चंद्रदेव आणि शुक्र मनातील नाजुक अनुभूतींचे देवता मानले गेले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती