वॅलेन्टाईन विशेष : कोवीड-19 मुळे काय गिफ्ट द्यावं

मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (18:30 IST)
यंदाच्या वर्षी कोविडच्या साथीच्या रोगामुळे सर्व काही स्थिर झाले आहे. तरी हळू-हळू आता गाडी पुन्हा रुळावर येत आहे. यंदाचे सर्व सण देखील कोवीड च्या प्रभावा खाली साजरे केले गेले. या वर्षी वॅलेन्टाईन डे देखील साजरा करण्यासाठी थोडे सृजनशील असणे आवश्यक आहे. असं काही करावं जेणे करून हे अधिक चांगले असेल आणि कायमचं लक्षात राहील. या वर्षी आपण आपल्या प्रियकराला असं काही गिफ्ट द्या जे श्रेष्ठ असेल. 
 
1 प्लांट्स सर्वोत्तम गिफ्ट असू शकत- 
या काळात हे आवश्यक आहे की आपले प्रेम दर्शविण्यासाठी थोडी काळजी देखील दाखविली पाहिजे आणि प्लांट्स आपल्या भावना दर्शविण्यासाठी उत्तम मार्ग असू शकतो. गुलाबा पासून मोगरा पर्यंत सुवासिक फुले किंवा असे झाडे जे हवा शुद्ध करतात देऊ शकता जे काळजी घेणारे प्लांट्स आहे. 
 
2 कस्टमाईझ्ड किंवा सानुकूलित गिफ्ट द्या-
आपण आपल्या प्रियकराला किंवा जोडीदाराला कस्टमाईझ्ड गिफ्ट देऊ शकता. या मध्ये फोटोफ्रेम, कीचेन, मिनिएचर स्टॅच्यू असं बरेच काही आहे जे या खास दिवसाची आठवण म्हणून बनवू शकता. जर आपल्याला एखाद्याला प्रभावित करावयाचे आहे तर आपण खोली फेयर टेल्स लाइटने सजवून फोटो मॉनिटाझ देखील करू शकता. ही खूप सोपी आणि स्वस्त पद्धत अतिशय प्रभावी ठरेल.
 
  3 दागिने- 
स्त्री असो किंवा पुरुष दोघांसाठी अंगठ्या, गळ्याची साखळी, हे चांगले पर्याय आहे. वॅलेन्टाईन गिफ्ट म्हणून. आजकाल सोनं आणि चांदीच्या किमती थोड्या कमी झाल्या आहेत आणि हे गिफ्ट चांगली गुंतवणूक आणि महागड्या गिफ्ट पैकी एक असू शकत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती