सहसा व्हॅलेंटाइन साजरा करणं सोपं आहे. बहुतेक लोक रेस्तराँमध्ये जातात आणि गुलाब, चॉकलेट आणि दागिने खरेदी करतात. पण यंदाच्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे सहज नाही. कारण काही भागात कोविड -19 चे नवीन स्ट्रेन आले आहे. ही एक चिंतेची बाब आहे. बऱ्याच ठिकाणी पुन्हा लॉक डाउन लागण्याची स्थिती बनत आहे. अशा परिस्थितीत व्हॅलेंटाइन कसा साजरा करावा? या साठी आपल्याला थोडे परिश्रम करावे लागतील. जेणे करून आपण व्हॅलेंटाइन डे चांगल्या प्रकारे साजरा करू शकाल.
आपण कधी कुकीज बॅक केल्या आहेत? घरीच कुकीज बनवून आपण आपल्या जोडीदाराला सरप्राइज देऊ शकता. आपण केक, कुकीज बनवू शकता. बॅकिंग करणे हे सामान्य स्वयंपाक करण्यापेक्षा वेगळे असू शकत. आपण ही क्रिया ग्रुप ऍक्टिव्हिटी मध्ये देखील सामायिक करू शकता. या व्यतिरिक्त आपण घरातच ट्रेझर हंट आणि डेट ची योजना आखू शकता. असं केल्यानं आपले संपूर्ण दिवस घरातच मनोरंजक कामात निघेल.
* होम स्पा-
आजकाल बऱ्याच सेवा होम स्पा ऑफर देतात आणि आपण कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय होम स्पा नियोजन करू शकता. आपण काही शीट मास्क, स्नॅक्स, मासिके, अरोमा थेरेपी कँडल, लाइट म्युझिक, स्पा क्रीम इत्यादी वापरू शकता.