प्रेमाचा आठवडा म्हणजेच व्हॅलेंटाईन वीक फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात साजरा केला जातो. या सात दिवसीय उत्सवाचा पाचवा दिवस 11 फेब्रुवारीला प्रॉमिस डे म्हणून साजरा केला जातो. या प्रेमाने भरलेल्या आठवड्यात, सुंदर वचने देऊन तुमचे नाते अधिक घट्ट करा. ही वचने कुणालाही दिली जाऊ शकतात, मग तो मित्र असो किंवा प्रिय जोडीदार.ही काही वाचणे जोडीदाराला दिल्यावर तुमच्यातील नाते आणि प्रेम अधिक दृढ होईल. चला तर मग जाणून घेऊ या.
पहिले प्रॉमिस-
तुमच्या जोडीदाराला वचन द्या की तुम्ही त्याच्यावर जसे आहे तसे प्रेम कराल. नात्यासाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी त्यांना बदलण्याचा प्रयत्न करणार नाही. अनेकदा जोडीदार त्याच्या/तिच्या प्रियकराच्या आवडीनिवडीनुसार जगू लागतो आणि त्यानुसार स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करतो. तो स्वतःमध्ये बदल घडवून आणू लागतो. तुम्ही त्यांना प्रॉमिस करा की तुम्ही त्यांच्याकडून बदलण्याची अपेक्षा करणार नाही.
चौथे प्रॉमिस-
तुम्ही तुमच्या जोडीदाराला त्याच्या इच्छेनुसार जीवन जगण्यात साथ द्याल. त्याने आपल्या भविष्याचे निर्णय मोकळेपणाने घेऊ द्यावे. तुम्ही सदैव सोबत असाल असे वचन द्या. तुमच्या जोडीदाराचे काही स्वप्न किंवा ध्येय असल्यास, ते पूर्ण करण्यासाठी त्याला प्रोत्साहन देण्याचे वचन द्या. त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्याचे वचन द्या.