या सवयी व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास वाढवतात

सोमवार, 4 ऑगस्ट 2025 (07:00 IST)
व्हेरिकोज व्हेन्स ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये शिरा सुजतात आणि वळतात, विशेषतः पाय आणि पायांच्या खालच्या भागात. या शिरा त्वचेखाली फुगलेल्या आणि वळलेल्या दिसू शकतात आणि बहुतेकदा वेदना, अस्वस्थता किंवा थकवा सोबत असतो.
ALSO READ: गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी हे घरगुती उपाय करा
फार काळ बसणं
एकाच ठिकाणी उभं राहणं त्रासदायक आहे त्याचप्रमाणे एकाच जागेवर बसून राहणंदेखील आरोग्याला नुकसानकारकच ठरते. डेस्क जॉब असणार्‍यांना हा त्रास अधिक जाणवतो. फार काळ बसून राहिल्याने लठ्ठपणा वाढण्यासोबतच व्हेरिकोज व्हेन्सचा त्रासही वाढतो. त्यामुळे ठराविक वेळाने उठून थोड्यावेळ  फिरा.
 
फार काळ उभं राहणं
काही लोकांना नोकरी करताना त्याचा एक भाग म्हणून सतत उभं राहव लागतं. एकाच जागी फार काळ उभं राहिल्यास व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास वाढतो. एकाच जागी उभं राहण्यापेक्षा थोडं चाला, फिरा. अन्यथा पायांवर ताण येतो. रक्त साखळण्याचा धोका वाढतो. हळूहळू रक्तवाहिन्यांमधील व्हॉल्वला देखील  नुकसान होते.
ALSO READ: सकाळी उठताच ही लक्षणे दिसली तर ही थायरॉईडची लक्षणे असू शकतात
हाय हिल्स
जास्त प्रमाणात हिल्स घालणं मुलींना फार आवडतं पण त्यामुळे आरोग्यावर नकळत काही परिणाम होऊ शकतो. हिल्स घालून चालल्याने रक्तवाहिन्यांच्या कार्यात अडथळा येतो. परिणामी व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास बळावतो.  
 
मिठाचा वापर जास्त   
वेफर्स, लोणचं, पापड यामध्ये मीठ अधिक असते पण त्याचा आहारात अधिक प्रमाणात समावेश केल्यास व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास वाढू शकतो. मिठामुळे शरीरात पाणी साचून राहते आणि त्याचा ताण रक्तवाहिन्यांवर येतो.
ALSO READ: तासनतास व्यायाम आणि डायटिंग करूनही वजन कमी होत नाहीये? तर या ५ सवयी कारण असू शकतात, आजच या सवयी सोडून द्या
पाय क्रॉस करून बसणं  
पायांवर पाय ठेवून बसण्याच्या सवयीमुळे पायांवर आणि हिप्सवरही ताण येतो. यामुळे रक्तवाहिन्या फुगतात. हळूहळू जाळं वाढतं. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती