उत्तर प्रदेशातल्या विजयानंतर योगी आदित्यनाथांची सभा

गुरूवार, 10 मार्च 2022 (18:33 IST)
यूपी विधानसभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप बहुमताने सरकार स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माध्यमांशी संवाद साधत जनतेचे आभार मानले. योगी आदित्यनाथ म्हणाले, "पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्त्वाखाली उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजप प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. आदरणीय पंतप्रधानांचे, आदरणीय राष्ट्रीय अध्यक्षांचे, गृहमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो."
 
"सर्वांचे लक्ष उत्तर प्रदेशच्या निकालाकडे होते. यूपीत प्रचंड बहुमत दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन केले, तसेच त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तेे म्हणाले की सामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच आज भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती