Passport Validity: : पासपोर्टची वैधता संपली आहे, काळजी करू नका, या सोप्या प्रक्रियेद्वारे लवकरच रिन्यू करा
शनिवार, 23 जुलै 2022 (14:29 IST)
Passport Re-Issue:आजच्या काळात पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट ही सर्वात महत्त्वाची कागदपत्रे बनली आहेत. परदेशात कुठेही जाण्यासाठी पासपोर्ट आवश्यक आहे. रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यासारख्या बहुतांश कागदपत्रांची वैधता असते. कालबाह्य तारखेनंतर, तुम्हाला या कागदपत्रांचे पुन्हा नूतनीकरण करावे लागेल. जर तुमचा पासपोर्ट कालबाह्य झाला असेल, तर तुम्ही काही सोप्या प्रक्रियेने त्याला रिन्यू करू शकता .
पासपोर्ट इंडियाच्या वेबसाइटनुसार, प्रौढ नागरिकाला 10 वर्षांसाठी पासपोर्ट जारी केला जातो. त्यानंतर ते कालबाह्य होते आणि पुन्हा नूतनीकरण करावे लागते. तर, अल्पवयीन मुलाला 5 वर्षांपर्यंतच्या कालावधीचा पासपोर्ट जारी केला जातो. यानंतर पासपोर्टचे पुन्हा नूतनीकरण करावे लागेल. या साठी वेगळे शुल्क आकारले जातात.
पासपोर्टचे नूतनीकरण करण्यासाठी या प्रक्रियेचे अनुसरण करा-