आर्यन खान देशाबाहेर जाऊ शकत नाही, दर शुक्रवारी NCB कार्यालयात हजर राहावे लागेल

शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (16:10 IST)
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला असला तरी त्याची अद्याप सुटका झालेली नाही. दरम्यान, न्यायालयाचा सविस्तर निर्णय समोर आला आहे. आर्यन खानला न्यायालयाने अनेक अटींवर जामीन मंजूर केला आहे. आर्यनला एक लाख रुपयांच्या बाँडसोबत पासपोर्ट जमा करावा लागेल. एनडीपीएस न्यायालयाच्या परवानगीशिवाय तो देश सोडून जाऊ शकणार नाही. याशिवाय मुंबईतील एनसीबी कार्यालयात दर शुक्रवारी रात्री 11 ते 2 या वेळेत हजेरी लावावी लागणार आहे.
 
2 ऑक्टोबरच्या रात्री मुंबई ते गोवा क्रूझवर जाणाऱ्या कथित रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आलेल्या आर्यन खानला 25 दिवसांनंतर हायकोर्टातून जामीन मिळाला आहे. त्याला एक लाख रुपयांचा पीआर बाँड जमा करावा लागेल, असे जामीन आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्याने अशा कोणत्याही कृतीत भाग घेऊ नये आणि सहआरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे.
 
उच्च न्यायालयाने त्याला तातडीने पासपोर्ट विशेष न्यायालयात जमा करण्यास सांगितले आहे. अर्जदाराला दर शुक्रवारी दुपारी 11 ते 2 या वेळेत मुंबईतील एनसीबी कार्यालयात जाऊन आपली उपस्थिती नोंदवावी लागेल, असेही आदेशात म्हटले आहे. एनडीपीएस न्यायालयाच्या परवानगीशिवाय आर्यनला देश सोडता येणार नाही.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती