ऑनलाईन दस्तऐवज सत्यापित करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

मंगळवार, 30 मार्च 2021 (17:40 IST)
जेव्हा आपण एखाद्या नोकरीसाठी अर्ज करता तेव्हा त्या कंपनी मार्फत आपली मुलाखत घेतली जाते.नंतर आपण दिलेल्या सर्व डाक्युमेंट किंवा दस्तऐवजची सत्यता तपासणी केली जाते. 
या प्रक्रियेद्वारे आपल्या सर्व प्रमाणपत्राची आणि गुणांची तपासणी केली जाते. ज्या वरून हे माहिती मिळते की ही जॉब योग्य व्यक्तीला मिळत आहे की नाही. तसेच कागद पत्राची तपासणी केल्याने कर्मचाऱ्या विषयी माहिती मिळवली जाते.
 
कागद पत्राची तपासणी कधी केली जाते- 
जेव्हा एखाद्या व्यक्ती अर्ज केल्या नंतर मुलाखतीसाठी जातो.तेव्हा   मुलाखत पूर्ण झाल्यावर त्यांची निवड झाल्यावर त्यांच्या कागदपत्राची तपासणी केली जाते. आपले कागदपत्र पडताळणी केल्यावर आपल्याला नियुक्ती पत्र देण्यात येईल. जेणे करून आपण ती नोकरी मिळवू शकता. 
 
दस्तऐवजांची पडताळणी कुठे करतात- 
आपल्याला एखाद्या संस्थेत नोकरी मिळवायची असेल तर 
त्या साठी आपण अर्ज करता, काही संस्था मुलाखत घेण्याच्या पूर्वी कागदपत्रांची तपासणी करतात तर काही संस्था मुलाखतीच्या नंतर कागदपत्रांची तपासणी करतात. 
आपल्याला एखाद्या सरकारी किंवा खासगी संस्थेत नोकरी मिळवायची असेल तर आपल्याला कागदपत्रांच्या तपासणीसाठी काही बाबी लक्षात ठेवायचा आहेत. 
* आपले प्रमाणपत्र आणि अर्ज फॉर्म मधील आपले नाव 
* आपल्या पालकांचे नाव 
* आपला एक फोटो 
 जर आपल्या कागदपत्रांमध्ये काही उणीवा असतील तर त्यात काही सुधारणा कराव्यात, अन्यथा कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असल्यास, जसे की फोटो व्यवस्थित नसल्यास किंवा पालकांच्या नावात काही त्रुटी आढळल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येते. 
 
* दस्तऐवजीच्या सत्यापनासाठी लागणारे महत्त्वपूर्ण दस्तऐवज -
* आपले हायस्कूल चे प्रमाणपत्र आणि गुणपत्रक.
*  आपले इंटरमीडिएट कॉलेज चे प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका.
* पदवीधराचे प्रमाणपत्र आणि गुणांक पत्रक (पदवीधर प्रमाणपत्र असल्यास).
* पदव्युत्तर शाळेचे प्रमाणपत्र, आणि गुणांक प्रमाण पत्र.
* आपल्या जातीचे प्रमाणपत्र, मूळ रहिवाशी प्रमाणपत्र.
* आपले आधारकार्ड, मतदार ओळख पत्र, दिव्यांग असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र.
* आपले नाव औपचारिकरित्या परिवर्तन झाले असल्यास राजपत्र अधिसूचना.
* माजी सैनिक असल्यास मूळ निर्वहन प्रमाणपत्र असावे.
आपल्याकडे ही सर्व कागदपत्रे असल्यास ही सर्व कागदपत्रे पूर्ण असावे. जेणे करून आपल्याला चांगली नोकरी मिळावी. 
 
कागदपत्रांची तपासणीची संपूर्ण प्रक्रिया -
विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रांची तपासणी करण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. कधी-कधी असे घडते की एखादा उमेदवार बनावटी कागदपत्रे देऊन नोकरी मिळवतो. फसवणूक टाळण्यासाठी ही योजना चालवण्यात आली आहे. 
कागदपत्र तपासणी करण्यासाठी समितीची स्थापना केली जाते. या समितीमध्ये असणारे तज्ज्ञ असून त्यांना उमेदवाराच्या कागदपत्र आणि प्रक्रिये संदर्भात सर्व नियमांची माहिती असते .म्हणजेच  या समितीमध्ये अशा लोकांची निवड केली जाते ज्यांना खरी आणि बनावटी कागदपत्रांची ओळख असते. 
या प्रक्रियेसाठी आपले दस्तऐवज घेऊन या समिती कडे जावे लागते. ही समिती हे ठरवते की आपले कागद पत्र खरे आहे की बनावटी.आवश्यक असल्यास आपली कागदपत्रे समिती जमा करते. 
त्यानंतर आपल्याला एक कागद दिला जातो. दस्तऐवजची तपासणी केल्यावर आपल्याला बोलवण्यात येते. जर आपले दस्तऐवज खरे असतील तर आपल्याला बोलवण्यात येईल आणि आपल्याला ती नोकरी देण्यात येईल. जर आपले कागदपत्र बनावट असल्यास आपले अर्ज खारीज करण्यात येईल. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती