भारतात सोन्याची खपत सर्वात अधिक आहे. गुंतवणुकीच्या व्यतिरिक्त भारतात फिजिकल गोल्डची देखील मागणी आहे. लोकांना स्वत:जवळ सोनं ठेवण्याची आवड असते. महिलांना सोन्याच्या दागिन्यांची अत्यंत आवड असते. विवाह तसेच इतर मांगलिक समारंभात देखील सोन्याची रक्कम दिली आणि घेतली जाते. पण हे सोनं किती खरं आहे हे जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला आहे का? येथे आम्ही आपल्याला 5 अशा सोप्या पद्धती सांगत आहोत, ज्याद्वारे आपण घरी बसल्या सोनं खरं आहे की खोटं हे माहित करु शकता.
नाइट्रिक एसिड
व्हिनेगरसारखेच नाइट्रिक एसिड देखील खरं-खोटं याची परख करु शकतं. खर्या सोन्यावर नाइट्रिक एसिड टाकल्यास प्रभाव पडत नाही. परंतू सोनं खोटं असेल तर एसिडचा प्रभाव दिसून येईल. केवळ एसिड टाकण्यापूर्वी सोनं जरा घासून घ्यावं. मग घासलेल्या भागावरच एसिड टाकावं. हे काम अगदी सावधपूर्वक करावं कारण एसिड नुकसान करु शकतं.
हॉलमार्क
आपल्याला सोन्याची गुणवत्ता बघायची गरज भासणार नाही जर आपण सोने खरेदी करताना त्यावर हॉलमार्क बघाल. हॉलमार्क सोनं खरं असल्याचा प्रमाण आहे. हे प्रमाण भारतीय मानक ब्यूरो द्वारे प्रदान केलं जातं. आपण जाहिरातींमध्ये हॉलमार्कबद्दल ऐकलंच असेल. सरकारने सोन्याचे दागिने आणि आर्टिफेक्ट्ससाठी हॉलमार्किंग आवश्यक असल्याचे सांगितले आहे.