ड्रायविंग लायसन्सला आधार कार्डाशी लिंक कसे कराल

गुरूवार, 25 मार्च 2021 (19:40 IST)
आपल्याला घरी बसल्या आपल्या ड्रायविंग लायसन्सला आधार कार्डाशी लिंक करायचे आहे. तर या साठीची प्रक्रिया जाणून घ्या.  
 
* सर्वप्रथम sarathi.parivahan.gov.in या संकेत स्थळावर क्लिक करा. 
 
* त्या राज्याला निवडा ज्या राज्याचे आपले लायसन्स आहे.
 
* Apply Online वर क्लिक करा.
 
* या नंतर Services on Driving Licence  (Renewal/Duplicate/Aedl/Others) वर क्लिक करा.
 
* आपल्या राज्याची माहिती प्रविष्ट करून Continue वर क्लिक करा.
 
* आपला ड्रायविंग नंबर प्रविष्ट करा आणि जन्म तिथी प्रविष्ट करून 'गेट डिटेल्स' वर क्लिक करा.
 
* आपल्या ड्रायविंग लायसन्सची संपूर्ण माहिती येईल, त्या नंतर प्रोसिड वर क्लिक करा.
 
* आता आपले 12 अंकी आधार क्रमांक आणि अधिकृत मोबाईल नंबर प्रविष्ट करा. 
 
* लक्षात ठेवा की आपला हा अधिकृत मोबाईल नंबर आधार कार्डाशी लिंक असावा. आता सबमिट करा.
 
* या नंतर आपल्याला एक ओटीपी येईल जे प्रविष्ट केल्यावर कन्फर्म करा.
 
* आपल्याला हे ऑनलाईन करायचे नसेल तर आपण आरटीओ कार्यालयात जाऊन देखील लायसन्स आधारकार्डाशी लिंक करू शकता. 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती