वडाळा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही घटना १५ एप्रिल रोजी दुपारी घडली. त्याच रात्री पोक्सो कायद्याच्या अंतर्गत अधिकृतपणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुलफराज जिउल आलम असे आरोपीचे नाव असून तो बिहारमधील कटिहार येथील रहिवासी असून त्याला अटक करण्यात आली आहे.
प्राथमिक तपासात असे दिसून आले की, आरोपी पीडितेच्या वडिलांसोबत मजूर म्हणून काम करत होता. तक्रारीनुसार, आरोपीने अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने उचलून नेले, व त्याचे लैंगिक शोषण केले. आरोपीने त्याला अनेक वेळा मारहाण केली आणि जर त्याने त्याच्या पालकांना याबद्दल सांगितले तर त्याला ठार मारण्याची धमकी देखील दिली. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून चौकशी सुरु आहे अशी माहिती सामोर आली आहे.