ज्वेलरी मेकिंग चार्ज, याचा हिशोब समजून घ्या

मंगळवार, 23 मार्च 2021 (13:30 IST)
आता लग्नसराई सुरु होत आहे. अशात सर्वात आधी धाव घेतली जाते खरेदीवर. त्यात दागिन्यांची खरेदी करण्यासाठी सराफा बाजारात चहल-पहल वाढू लागते. सोन्याची खरेदी करणे सोपे नसतं कारण त्यासाठी किंमत, डिजाइन, शुद्धता, आणि मेकिंग चार्ज या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. दागिने तयार करताना मेंकिग चार्ज खर्चातील वेगळाच भाग असतो. डिझाइनप्रमाणे यात अंतर असतं.
 
जेव्हा आपण सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी जातो तेव्हा सोन्याच्या किमतीव्यतिरिक्त मेकिंच चार्ज आणि जीएसटी वेगळ्याने द्यावं लागतं. दागिन्याच्या डिझाइनची निवड झाल्यावर त्यावर किती मेकिंग लागेल हे निश्चित केलं जातं. जर दागिन्यात नाजुक आणि जडाऊ काम असेल तर मेकिंग जार्च अधिक असतात. मेकिंग चार्ज प्रति ग्रॅम च्या हिशाबाने लागतात. हे 3 टक्कयापासून ते 25 टक्क्यांपर्यंत असू शकतात. दागिन्यांमध्ये 2-5 टक्के वेस्टेज चार्ज असतं.
 
दागिने खरेदी करताना हॉलमार्क बघून घ्यावं. एक्सचेंज किंवा विकताना हॉलमार्क असलेल्या दागिन्यांची योग्य ‍किंमत मिळते. विक्रीच्या वेळी हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची किंमत सध्याच्या बाजारभावावर निश्चित केली जाते. म्हणून केवळ हॉलमार्क प्रमाणपत्र दागदागिने खरेदी करावे.
 
375 हॉलमार्क- 37.5 % शुद्ध शुद्धता
585 हॉलमार्क- 58.5 % शुद्ध शुद्धता
750 हॉलमार्क- 75.0 % शुद्ध शुद्धता
916 हॉलमार्क- 91.6 % शुद्ध शुद्धता
990 हॉलमार्क- 99.0 % शुद्ध शुद्धता
999 हॉलमार्क- 99.9 % शुद्ध शुद्धता
 
सामान्यत: दागिने 22 कॅरेट किंवा 91.6 टक्के शुद्ध सोन्याचे विकले जातात. 22 कॅरेट असलेल्या दागिन्यांवर 915 हॉलमार्क चिह्न अंकित असतं. 18 कॅरेटच्या दागिन्यांचं सोनं 75 टक्के शुद्ध असतं.
 
जर आपण सोन्याची किंवा चांदीची खरेदी करत असाल तर सोनाराकडून बिल नक्की घ्या. या बिलमध्ये आपल्या सोन्याची शुद्धता आणि किंमत संबंधी माहिती देण्यात येते. बिल असल्यास दागिने विकताना ‍किंवा एक्सचेंज करताना योग्य किंमत मिळू शकेल. ‍बिल नसल्यास आपल्या नुकसान झेलावं लागू शकतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती