शपथ केवळ 35 शब्‍दांची

वेबदुनिया

मंगळवार, 20 जानेवारी 2009 (16:57 IST)
जगातील महासत्‍ता समजल्‍या जाणा-या अमेरिकेच्‍या सर्वाधिक मोठ्या राष्‍ट्राध्‍यक्षपदाची शपथ मात्र अवघ्‍या 35 शब्‍दांची आहे. राष्‍ट्राध्‍यक्षपदाची शपथ अमेरिकन घटनेच्‍या कलम 2 च्‍या पहिल्‍या परिच्‍छेदात देण्‍यात आला आहे. हे 35 शब्‍द असे-
''आय बराक ओबामा डू सोलेमली स्‍वेअर दॅट आय वील फेथफूली एक्‍झीक्‍युट द ऑफिस ऑफ प्रसिडेंट ऑफ दि युनायटेड स्‍टेट्स, एण्‍ड वील टू दि बेस्‍ट ऑफ माय एबिलीटी, प्रीसर्व्ह, प्रोटेक्ट एण्‍ड डिफेंड दि कॉन्‍स्‍टीट्युशन ऑफ दि युनायटेड स्‍टेटस्''

या शपथेच्‍या शेवटी पहिले राष्‍ट्रपती जॉर्ज वॉशिंग्‍टन यांनी 'सो हेल्‍प मी गॉड...' हे चार शब्‍द जोडले आहे. ते जवळपास प्रत्यक राष्‍ट्राध्‍यक्ष आपल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण शैलीत शेवटी जोडतो.

वेबदुनिया वर वाचा