निवडणुकीपूर्वीचे ओबामांचे भाषण

नई दुनिया

बुधवार, 5 नोव्हेंबर 2008 (11:01 IST)
'जर मला आपण मंगळवारी मत द्याल, तर मी आपल्याला वचन देतो की मी अमेरिकी ओळख बदलवून दाखवेल'. गेल्या काही दिवसांपासून जगापुढे अमेरिकेचा चुकीचा चेहरा जात असून, अर्थव्यवस्थाही कोलमडल्याने देश आर्थिक अडचणीत सापडला आहे. जर मी निवडून आलो तर मी या साऱ्या समस्या सोडवण्याचे आपल्याला वचन देतो.

अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी डेमोक्रेटीक पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार बराक ओबामा यांनी केलेल्या या आवाहनानंतर अमेरिकेतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. काही राजकीय विश्लेषकांनी तर ओबामांचाच विजय निश्चित असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी तर याची तयारीही सुरू केली आहे.

ओबामांच्या या भाषणानंतर रिपब्लिकन उमेदवार जॉन मेक्कन यांना त्यांच्या एरिजोना या स्वतः:च्या राज्यासह नॉर्थ डकोटा, जॉर्जिया, मिसौरी, इंडियाना, या प्रांतातून विरोधाचा सामना करावा लागत आहे.

दुसरीकडे ओबामांनी या काळात झंझावाती दोरा करत दिलेल्या भाषणांनी त्यांचा प्रभाव या भागांमध्ये चांगलाच वाढला आहे.

यानंतर जॉर्ज बुश यांच्या पावलावर पाऊल ठेवत ओबामांच्या मुखवट्यांची मागणीही याभागात वाढली असून, त्यांना नागरिकांचे जोरदार समर्थन मिळत आहे.

वेबदुनिया वर वाचा