सर्वात आधी आवळे स्वच्छ धुवून तुकडे करून घ्यावे. आता हे आवळे एक लिटर पाण्यामध्ये उकळून घ्यावे. आता पाणी काढून हे आवळे तुकडे मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यावी. आता एक कढईमध्ये पाणी घालून त्यामध्ये गूळ घालावा व पाक तयार करून घ्यावा. आता यामध्ये सुंठ पावडर, मिरे पूड, दालचीनी व इतर मसाले बारीक दळून घालावे.आता एका कढईमध्ये तूप गरम करावे. त्यामध्ये आवळा पेस्ट परतवून घ्यावी. आता गुळाचा पाक, मसाल्यांचे मिश्रण, बारीक केलेले तुळशीचे पाने घालावे.आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे ढवळत राहावे व शिजू द्यावे. चावनप्राश घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा. थंड झाल्यानंतर यामध्ये मध आणि केशर घालावे. आता याला एका काचेच्या बाटलीमध्ये स्टोर करावे. तर चला तयार आहे आपला आरोग्यवर्धक आवळ्याच्या चावनप्राश रेसिपी, याच्या नियमित सेवनाने तुमची रोगप्रतिकात्मक शक्ती नक्कीची वाढेल.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.