या दोघांनी 10 मिनिटांत भारतासाठी 2 पदके निश्चित केली. आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची 5 पदके निश्चित झाली आहेत. भारताने आतापर्यंत कुस्तीत 7 पदके जिंकली आहेत. रवी आणि दीपकच्या आधी केडी जाधव, सुशील कुमार (2),योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिक यांनी विजय मिळवला आहे.भारताने पुरुषांच्या कुस्तीत 6 पदके जिंकली आहेत.
लोव्हलीना च्या बाबतीतही असेच आहे. आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पक्क करणाऱ्या लोव्हलिनाला आता रौप्य किंवा सुवर्णपदक मिळवायचे आहे. याशिवाय भारताकडून कुस्ती, अॅथलेटिक्स आणि गोल्फमध्येही चांगली कामगिरी अपेक्षित असेल.