अभिनंदनवर पाकिस्तानची लज्जास्पद जाहिरात, सानिया मिर्झा संतापली

वर्ल्डकप सुरू होऊन दोन आठवडे होत असले तरी सर्वांची नजर केवळ भारत- पाकिस्तान दरम्यान रविवारी होणार्‍या सामन्यावर टिकून आहे. या मॅचबद्दल दोन्ही देशांमध्ये खूप उत्सुकता आहे. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन्ही देशांमध्ये यावर जाहिरात युद्ध सुरू झाले आहे. दोन्ही देश एकमेकाला कमी दाखवण्याची संधी सोडत नाहीये.
 
वर्ल्डकप मध्ये भारत - पाकिस्तान यांच्या होणार्‍या सामन्यापूर्वी दोन्ही देशांमध्ये अॅड वॉर सुरू झालं आहे. यावर स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्झाने भारत - पाकिस्तान यांच्या बहुप्रतीक्षित विश्व कप सामना होण्यापूर्वी लाजिरवाण्या जाहिरातींवर संताप व्यक्त केला आहे. दोन्ही प्रतिस्पर्धी संघांत रविवारी होणार्‍या सामन्यापूर्वी दोन्ही देशांच्या टीव्ही चॅनल्सवर जाहिरात युद्ध सुरू आहे ज्यात काही दुर्भावनापूर्ण कंटेट असलेल्या जाहिराती दर्शवल्या जात आहे.
 
जाहिरातींवर सानिया मिर्झाची ट्विट सोशल मीडियावर खूप व्हायल होत आहे.
 
पाकिस्तानमध्ये एक जाहिरात तयार करण्यात आली आहे ज्यात एक व्यक्ती विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यावर थट्टा करताना दिसत आहे. आपल्याला माहीतच असेल की अभिनंदन यांना बालाकोटमध्ये भारताच्या हवाई हल्ल्याच्या एक दिवसानंतर पाकिस्तान सेनेने धरले होते.
 
या 33 सेकंदाच्या जाहिरातीत मॉडलला भारताच्या निळ्या जर्सीमध्ये दाखवले गेले आहे आणि त्याच्या मिशा अभिनंदन यांच्या सारख्या दर्शवल्या गेल्या आहेत. या सामन्यासाठी भारताची रणनीतीबद्दल विचारल्यावर अभिनंदन यांच्या व्हायरल टिप्पणीप्रमाणे मॉडल असं म्हणताना दिसत आहे, ’मला माफ करा मी आपल्याला याबद्दल माहिती देण्यासाठी बाध्य नाही.’ 
 
तसेच भारतात एका जाहिरात दाखवण्यात येत आहे ज्यात भारतीय समर्थक स्वत:ला पाकिस्तानचा ‘अब्बू’ म्हणजे बाप सांगत आहे. ही जाहिरात विश्व चषकात पाकिस्तानवर भारतीय संघाच्या दबदबा असल्याच्या संदर्भात आहे.
 
हे सर्व बघून सानिया मिर्झाने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले की, ‘बॉर्डरच्या दोन्ही बाजूला लज्जास्पद सामुग्री असलेल्या जाहिराती, गंभीर व्हा, आपल्याला या प्रकारे बकवास करत हाइप करण्याची किंवा सामन्याच्या प्रचाराची गरज नाही. आधीपासूनच यावर पुरेशी नजर आहे. हे केवळ क्रिकेट आहे.’

Cringeworthy ads on both sides of the border

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती