सायना, प्रणीत व श्रीकांत थालंडला रवाना

सोमवार, 4 जानेवारी 2021 (14:49 IST)
ऑलिम्पिक कोट्याचे दावेदार असलेले भारताचे बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल, बी. साई प्रणीत व किदाम्बी श्रीकांत रविवारी थालंडला रवाना झाले. त्याठिकाणी ते दोन बीडब्ल्यूएफ विश्व टूर सुपर 1000 स्पर्धेत सहभागी होतील.
 
कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धा स्थगित केल्यानंतर श्रीकांतने ऑक्टोबर 2020 मध्ये डेनमार्क सुपर 750 मध्ये भाग घेतला होता. तर अन्य खेळाडू जवळ-जवळ 10 महिन्यांनंतर एखाद्या स्पर्धेत सहभागी होत आहेत.
 
ऑलिम्पिकपदक विजेती पी. व्ही. सिंधू रविवारी लंडनहून दोहामार्गे बँकाँकला पोहोचेल. कोरोनामुळे आलेल्या अडथळ्यानंतर तिची ही पहिलीच टुर्नामेंट असेल. मागील वर्षी मार्चमध्ये ऑल इंग्लंड चॅम्पियनशीपनंतर  डब्ल्यूएफ स्पर्धा रद्द करावी लागली होती. यादरम्यान डेनमार्क ओपनशिवाय सारलोरलक्स सुपर 100 टुर्नामेंटचे  आयोजनही होऊ शकते.
 
आता सर्वांची नजर सुपर 1000 च्या दोन स्पर्धांवर आहे. ज्यामध्ये योनेक्स थायलंड ओपन (12 ते 17 जानेवारी) आणि टायोटा थायलंड ओपन (19 ते 24 जानेवारी) या स्पर्धा होतील. या स्पर्धांमध्ये जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडू दीर्घ विश्रांतीनंतर पुनरागमन करतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती