ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये फेडरर खेळणार नाही

मंगळवार, 29 डिसेंबर 2020 (13:12 IST)
8 फेब्रुवारीपासून सुरू होणार्यार ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये रॉजर फेडरर यंदा खेळताना दिसणार नाही. फेडररच्या कारकिर्दीतील ही पहिलीच वेळ असेल, ज्यावेळी तो या टुर्नामेंटचा भाग नसेल. 21 ग्रँडस्लॅम विजेता फेडरर गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत आहे. त्यामुळे त्याने हा निर्णय घेतला आहे. फेडररवर नुकतीच गुडघ्याची शस्त्रक्रिया केली आहे व तो दीर्घ कालावधीनंतर सराव करण्यासाठी परतला आहे.
 
वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅमचे आयोजन 18 जानेवारीपासून होणार होते. मात्र, कोरोनाचा प्रभाव वाढल्याने ही स्पर्धा तीन आठवडे पुढे ढकलण्यात आली होती. ऑस्ट्रेलियन ओपनच्या आयोजकांनी सांगितले की, फेडरर दुखापतीतून सावरत आहे. त्यामुळे तो या स्पर्धेत यंदा सहभागी होणार नाही.
 
तो आपल्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने फेब्रुवारीपासून खेळापासून दूर आहे. त्याने   नुकतेच सराव करणे सुरू केले आहे. 2000 साली पदार्पण केल्यानंतर फेडररची ही पहिलीच वेळ असेल ज्यावेळी हा दिग्गज खेळाडू ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळताना दिसणार नाही. त्याने आपल्या कारकिर्दीत हा खिताब सहावेळा आपल्या नावे केला आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती