मागील दोन विजेते आणि यावेळी गटातील सर्व सहा सामने जिंकलेले संघ, रियल माद्रिद आणि मँचेस्टर सिटी चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत भिडतील. या दोघांमधील पहिला लेग ९ किंवा १० एप्रिल रोजी माद्रिदमध्ये खेळवला जाईल. कायलियन एमबाप्पेचा संघ पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) उपांत्यपूर्व फेरीत बार्सिलोनाशी भिडणार आहे. पहिला टप्पा पॅरिसमध्ये खेळवला जाईल. आर्सेनलचा सामना हॅरी केनच्या बायर्न म्युनिचशी होईल, तर दुसरा उपांत्यपूर्व सामना ऍथलेटिक माद्रिद आणि बोरुसिया डॉर्टमंड यांच्यात होईल. युरोपा लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत लिव्हरपूलची अटलांटाशी, बायर लेव्हरकुसेनची वेस्टहॅमशी, बेनफिकाची मार्सेलीशी आणि एसी मिलानची रोमाशी लढत होईल.
ऍटलेटिको माद्रिद (स्पेन) विरुद्ध बोरुसिया डॉर्टमुंड (जर्मनी)
रिअल माद्रिद (स्पेन) विरुद्ध मँचेस्टर सिटी (इंग्लंड)