महिला प्रो लीग हॉकीच्या युरोपियन लेगसाठी भारताने सोमवारी 24 सदस्यीय संघाची घोषणा केली आणि मिडफिल्डर सलीमा टेटेला कर्णधार म्हणून निवडण्यात आले. भारत 14 ते 29 जून दरम्यान लंडन, अँटवर्प आणि बर्लिन येथे ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, बेल्जियम आणि चीन विरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळेल. संघ १४ जून रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.
अनुभवी फॉरवर्ड नवनीत कौर उपकर्णधार असेल. संघात गोलरक्षक सविता आणि बिचू देवी खरीबम यांचा समावेश आहे. अनुभवी सुशीला चानू पुक्रंबम, ज्योती, सुमन देवी थौडम, ज्योती सिंग, इशिका चौधरी आणि ज्योती छत्री बचावपटू असतील. मिडफिल्डची जबाबदारी वैष्णवी विठ्ठल फाळके, सुजाता कुजूर, मनीषा चौहान, नेहा, सलीमा, लालरेमसियामी, शर्मिला देवी, सुनीता टोप्पो आणि महिमा टेटे यांच्या खांद्यावर असेल.
दीपिका, नवनीत, दीपिका सोरेंग, बलजीत कौर, रुतुजा दादासो पिसाळ, ब्यूटी डुंगडुंग आणि साक्षी राणा हे फॉरवर्ड असतील. स्टँडबाय यादीत गोलकीपर बन्सरी सोलंकी आणि बचावपटू अझमिना कुजूर यांचा समावेश आहे. संघ निवडीबद्दल बोलताना भारतीय महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंग म्हणाले, 'आम्ही एक संतुलित संघ तयार केला आहे ज्यामध्ये अनुभव आणि तरुण प्रतिभेचे मिश्रण आहे. युरोपियन टप्पा हा प्रो लीगचा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि आम्ही जगातील काही सर्वोत्तम संघांविरुद्ध आव्हानात्मक सामन्यांची वाट पाहत आहोत.