Common Wealth Games 2022 : अविनाश साबळेनं 3000 मीटर स्टीपलचेस मध्ये पटकावलं राैप्यपदक

शनिवार, 6 ऑगस्ट 2022 (17:40 IST)
Common Wealth Games 2022 :2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत 28 पदके जिंकली आहेत. यामध्ये आठ सुवर्ण, 10 रौप्य आणि नऊ कांस्य पदकांचा समावेश आहे. आज 10,000 मीटर वॉकमध्ये प्रियंका आणि 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये मराठमाेळ्या अविनाश साबळेने रौप्य पदक जिंकले.अविनाश साबळेने पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्य पदक जिंकले. अविनाशने 8.11.20 मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. यासह त्याने तीन हजार मीटर शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम केला. तो सुवर्णपदक विजेता अब्राहम किबिव्होटपेक्षा फक्त 0.5 सेकंद मागे होता. केनिया अब्राहमने 8.11.15 मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. तर केनियाच्या अमोस सेरेमने 8.16.83 मिनिटांत आपली शर्यत पूर्ण करून कांस्यपदक पटकावले. 
 
भारताचे
9 सुवर्णपदक:  मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शिउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर (पॉवर लिफ्टिंग), बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया
10 रौप्य:  संकेत सरगरी, बिंदियाराणी, सुशिला देवी, सुधीर देवी विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियांका, अविनाश साबळे
9 कांस्य: गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, सौरव घोषाल, गुरदीप सिंग, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती