Commonwealth Games 2022, Wrestling: बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या 2022 कॉमनवेल्थ गेम्समध्ये कुस्तीचे सामने सुरू झाले आहेत. भारताच्या दीपक पुनिया आणि बजरंग पुनिया यांनी पुरुष विभागात उपांत्यपूर्व फेरीचे सामने जिंकले आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. महिलांच्या कुस्ती स्पर्धेत भारताच्या साक्षी मलिक आणि अंशू मलिक यांनीही बाजी मारली. दोघांनी शानदार विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.