अलीकडेच नीरजने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिले होते. अंजू बॉबी जॉर्ज (2003) नंतर असे करणारा तो दुसरा खेळाडू ठरला. मात्र, त्याच स्पर्धेत त्याला दुखापतही झाली. नीरज चोप्राला जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकीच्या अंतिम सामन्यात दुखापत झाली होती. फायनलमध्ये नीरजही मांडीला पट्टी बांधताना दिसले.
जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेनंतर, नीरज चोप्राचा एमआरआय स्कॅन करण्यात आला, ज्यामध्ये ग्रोईंन इंज्युरी ची बाब आढळून आली. अशा परिस्थितीत नीरज चोप्राला जवळपास एक महिना विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, त्यामुळेच तो 2022च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून बाहेर पडला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत नीरज चोप्राचा सामना 5ऑगस्ट रोजी होणार होता, त्याच दिवशी भालाफेक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आता या क्षेत्रात भारताच्या आशा आशा डीपी मनू आणि रोहित यादव यांच्याकडून आहेत. आता हे दोघेही भालाफेकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील.