Commonwealth Games 2022 Ind vs ENG T20 Semi Final Cricket Match :राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना सुरू आहे. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत सुवर्णपदकासाठी खेळेल. त्याचबरोबर पराभूत संघाला कांस्यपदकासाठी खेळावे लागणार आहे.
कॉमनवेल्थ गेम्सच्या उपांत्य फेरीत भारतीय महिला क्रिकेट संघाचा सामना इंग्लंडशी होत आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकून अंतिम फेरीत स्थान मिळवायचे आहे. अंतिम फेरीत पोहोचणारा संघ किमान रौप्य पदकही निश्चित करेल. त्याचवेळी पराभूत संघाला कांस्यपदकासाठी दुसऱ्या उपांत्य फेरीत पराभूत संघाचा सामना करावा लागेल.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत: स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), तानिया भाटिया (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, स्नेह राणा, मेघना सिंग, रेणुका सिंग.
इंग्लंड: डॅनियल यट, सोफिया डंकले, नताली सायव्हर (सी), एमी जोन्स (विकेटकीपर), माइया बाउचर, अॅलिस कॅप्सी, कॅथरीन ब्रंट, सोफी एक्लेस्टोन, फ्रेया केम्प, इस्सी वोंग, सारा ग्लेन.