Chess World Cup: कारुआनाला टायब्रेकरमध्ये पराभूत करून प्रज्ञानानंदा अंतिम फेरीत

Webdunia
मंगळवार, 22 ऑगस्ट 2023 (07:10 IST)
अठरा वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंदा उपांत्य फेरीच्या सामन्याच्या टायब्रेकरमध्ये जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या फॅबियानो कारुआनाचा 3.5-2.5 असा पराभव करून FIDE जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीतील पहिल्या दोन गेमनंतर दोन्ही खेळाडू 1-1 ने बरोबरीत होते. थरारक टायब्रेकरमध्ये भारतीय खेळाडूने संयमाने खेळ करत गेम जिंकला. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकाचा बुद्धिबळपटू फॅबियानोचा पराभव करून प्रज्ञानंधाने इतिहास रचला.
<

Praggnanandhaa goes to the final of the #FIDEWorldCup

Praggnanandhaa beats world number 3 Fabiano Caruana 3.5-2.5 after tiebreaks and will battle it out against Magnus Carlsen for the title

(File pic) pic.twitter.com/8yxXhIXcEB

— ANI (@ANI) August 21, 2023 >
प्रज्ञानानंदाशी मॅग्नस कार्लसनचा सामना होईल. पाच वेळा विश्वविजेता भारताचा दिग्गज विश्वनाथन आनंद याने प्रज्ञानानंदाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. विश्वनाथनने X वर सांगितले की प्रज्ञानानंदाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने कारुआनाला टायब्रेकरमध्ये पराभूत केले आणि अप्रतिम  कामगिरी केली . 

टायब्रेकरनंतर प्रज्ञानानंदाने विजय मिळवला. त्याच्याकडून काही मोठ्या अपेक्षा होत्या आणि तसं घडलं. आता त्याचे डोळे अंतिम सामन्याकडे लागले आहेत.

Edited by - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

पुढील लेख