शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात सतीश आणि आद्य जोडीने 22-20, 21-14 असा विजय मिळवला. के साई प्रतीक आणि कृष्ण प्रसाद गारागाने रविवारी झालेल्या अंतिम फेरीत मेक्सिकोच्या जॉब कॅस्टिलो आणि लुईस अरमांडो मोंटोया यांचा 21-18, 21-19 असा पराभव करून पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
पुरुष एकेरीत मात्र सतीशला अंतिम फेरीत हाँगकाँगच्या गुयेन है डांगकडून 17-21, 18-21असा पराभव पत्करावा लागला. महिला एकेरीत चौथ्या मानांकित तसनीम मीरला हाँगकाँगच्या हसीन यान हॅप्पी लो हिच्याकडून 14-21, 12-21 असा पराभव पत्करावा लागला.