एशियन गेम्स : भारताच्या खात्यात किती पदकं? कुठे होत आहे स्पर्धा?

रविवार, 24 सप्टेंबर 2023 (10:41 IST)
हांगझोऊ इथे होत असलेल्या 19 व्या एशियन गेम्समध्ये भारताने दोन पदकं जिंकली आहेत.
महिलांच्या 10 मीटर एअर रायफल टीम इव्हेंटमध्ये भारताच्या मेहुली घोष, रमिता जिंदाल आणि आशी चौक्से यांनी 1886 पॉइंट्स कमावत रौप्य पदक जिंकलं.
 
रमिताने 631.9 , मेहुलीने 630.8 आणि आशीने 623.3 पॉइंट्स कमावले.
 
चीनने 1896.6 पॉइंट्सची कमाई करत सुवर्णपदक जिंकलं.
 
दुसरीकडे भारतीय नाविक अर्जुन लाल आणि अरविंद सिंह यांनी लाइटवेट डबल स्कल्समध्ये रौप्य पदकं जिंकलं. दोघांनीही साडे सहा मिनिटांपेक्षाही कमी कालावधीत आपली शर्य़त पूर्ण केली.
 
या शर्यतीत चीनने सुवर्णपदक, तर उझबेकिस्तानने कांस्य पदक जिंकलं.
23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत चीनमधील हांगझोऊ येथे 19 व्या आशियाई क्रीडा (एशियन गेम्स) स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
 
ही क्रीडा स्पर्धा मागील वर्षीच आयोजित करण्यात येणार होती पण कोविड-19 च्या वाढत्या प्रकरणांमुळं ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती.
 
याआधी 1951 ते 2018 पर्यंत 18 वेळा आशियाई खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं.
 
यावेळी कोणता खेळ आणि खेळाडू याकडे सर्वांचे लक्ष असेल, जाणून घ्या अशा सर्व गोष्टी.
 
एशियन गेम्स-2023 कुठे होत आहेत?
23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत चीनमधील हांगझोऊ शहरात 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
 
हांगझोऊ हे यजमान शहर आहे, याशिवाय इतर पाच शहरं निंगबो, वेनझो, हू झो, शाओशिंग, जिनहुआ यांनाही या कार्यक्रमासाठी सह-यजमान बनवण्यात आलं आहे.
 
आशियाई क्रीडा स्पर्धेत किती देश सहभागी होत आहेत?
हांगझोऊ आशियाई खेळात एकूण 40 खेळांचं आयोजन केलं जाईल. या खेळांच्या 61 शाखांमध्ये एकूण 481 स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे.
 
या खेळांमध्ये भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, इराण आणि इंडोनेशियासह एकूण 45 देश सहभागी होणार आहेत. सुमारे 12 हजार खेळाडूंनी यासाठी नोंदणी केली आहे.
 
भारतातून किती खेळाडू सहभागी होत आहेत?
38 खेळांमध्ये भारतातून एकूण 634 खेळाडू सहभागी होत आहेत. अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी संघ सर्वात मोठा असून, एकूण 65 खेळाडू पाठवले जात आहेत.
 
पुरुष आणि महिला फुटबॉल संघात 44 खेळाडूंचा समावेश आहे, तर नौकानयनात 33, नेमबाजीत 30 आणि बॅडमिंटनमधील 19 खेळाडूंचा संघ आशियाई क्रीडा स्पर्धा-2023 मध्ये सहभागी होणार आहे.
 
भारताकडून बाजूनं कोण कोण सहभागी होत आहे, संपूर्ण यादी पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
 
भारताला कोणता खेळ आणि खेळाडू यांच्याकडून पदकांची आशा आहे?
18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताची कामगिरी ही आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी मानली जाते. भारतानं एकूण 69 पदक जिंकली होती. त्यात 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 कांस्य पदक होती.
 
1951 ते 2018 पर्यंतच्या आशियाई खेळांमधील भारताच्या कामगिरीवर नजर टाकली तर भारतीय खेळाडूंनी अॅथलेटिक्समध्ये सर्वाधिक 240 पदक जिंकली आहेत.
 
भालाफेकपटू नीरज चोप्रा या संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यानं सुवर्णपदक जिंकलं.
 
या खेळाडूंकडून पदकाची आशा
अॅथलेटिक्स (ट्रॅक आणि फील्ड):
 
नीरज चोप्रा - पुरुष भालाफेक
 
मुहम्मद अनस याहिया 4x400 मीटर मिक्स रिले, पुरुष 400 मी, पुरुष 4x400 मीटर रिले
 
ज्योती याराजी - महिला 100 मीटर हर्डल्स, महिला 200 मीटर
 
मनप्रीत कौर - महिला गोळा फेक
 
शैली सिंग - महिलांची लांब उडी
 
बॅडमिंटन:
 
किदाम्बी श्रीकांत - पुरुष सिंगल्स
 
लक्ष्य सेन - पुरुष सिंगल्स
 
पी व्ही सिंधू - महिला सिंगल्स
 
गायत्री गोपीचंद - महिला डबल्स
 
एच एस प्रणॉय - पुरुष सिंगल्स
 
त्रिसा जॉली - महिला डबल्स
 
बॉक्सिंग:
 
निखत जरीन - महिला 50 कि.ग्रॅ
 
प्रीती पवार - महिला 54 कि.ग्रॅ
 
परवीन हुड्डा - महिला 57 कि.ग्रॅ
 
जास्मिन लॅम्बोरिया - महिला 60 कि.ग्रॅ
 
लवलीना बोरगोहाईं - महिला 75 कि.ग्रॅ
 
बुद्धिबळ
 
प्रज्ञानानंद - पुरुष
 
कोनेरू हंपी - महिला
 
हरिका द्रोणवल्ली - महिला
 
वैशाली रमेश बाबू - महिला
 
गुकेश डी - पुरुष
 
विदित गुजराती - पुरुष
 
फेन्सिंग : (तलवारबाजी)
 
भवानी देवी
गोल्फ:
 
अदिती अशोक - महिला
 
स्क्वॅश:
 
ज्योश्ना चिनप्पा - महिला
 
दीपिका पल्लीकल - महिला
 
अनाहत सिंह - महिला
 
वेट लिफ्टिंग
 
मीराबाई चानू - महिला 49 कि.ग्रॅ
 
शूटिंग:
 
मनू भाकर - महिला 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तूल
 
रिद्धीम सांगवान - महिला 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तूल
 
सिफ्ट कौर समरा – महिलांची 50 मीटर रायफल 3-पोझिशन
 
कुस्ती:
 
अंतिम पंघाल - महिला 53 कि.ग्रॅ
 
बजरंग पुनिया - पुरुष 65 कि.ग्रॅ
 
दीपक पुनिया
 
टेबल टेनिस:
 
शरथ कमल - पुरुष सिंगल्स, डबल्स
 
जी सत्यन - पुरुष सिंगल्स, डबल्स, मिक्स्ड डबल्स
 
मनिका बत्रा - महिला सिंगल्स, मिक्स्ड डबल्स
 
तिरंदाजी:
 
अतनु दास
 
अदिती गोपीचंद स्वामी
 
प्रनीत कौर
 
हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी संघांकडूनही पदकांच्या आशा आहेत.
 
आशियाई खेळ-2023 स्पर्धेत टी-20 फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला जाईल
 
आशियाई क्रीडा स्पर्धेत टी-20 फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला जाईल. भारतानं प्रथमच पुरुष आणि महिला क्रिकेट संघ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी आयसीसीनं आशियाई खेळांमध्ये होणाऱ्या या सामन्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दर्जाही दिला आहे.
 
पुरुष आणि महिला दोन्ही संघांसाठी प्रत्येकी 20 खेळाडूंचा संघ पाठवला जाईल. 5-5 खेळाडूंना राखीव ठेवलं जाईल.
 
28 सप्टेंबरपासून पुरुष संघांचं सामने सुरू होणार असून अंतिम सामना 7 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
 
महिला संघांचे सामने 19 ते 28 सप्टेंबर दरम्यान झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी क्रिकेट फील्ड येथे खेळवले जातील.
 
भारतीय पुरुष क्रिकेट संघ : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जायसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, आवेश खान, अर्शदीप सिंह, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंह (यष्टीरक्षक)
 
राखीव खेळाडू: यश ठाकूर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई किशोर, साई सुदर्शन
 
भारतीय महिला क्रिकेट संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, अमनजोत कौर, रिचा घोष (यष्टीरक्षक), अंजली सरवानी, देविका वैद्य, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मणि, कनिका आहुजा, तीतास साधू, अनुषा बारेड्डी, उमा छेत्री (यष्टीरक्षक)
 
राखीव खेळाडू: काशवी गौतम, स्नेह राणा, हरलीन देओल, पूजा वस्त्राकर, सैका इशाक
 
आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणते देश अव्वल राहिले?
पहिली आशियाई क्रीडा स्पर्धा 1951 मध्ये नवी दिल्ली येथे झाली. हे खेळ पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार 1950 मध्ये होणार होते, परंतु तयारीला उशीर झाल्यामुळे ते 1951 पर्यंत पुढे ढकलण्यात आले. लंडनमध्ये 1948 च्या ऑलिम्पिकमध्ये जपानला सहभागी होण्याची परवानगी नव्हती आणि आशियाई क्रीडा महासंघाच्या स्थापनेच्या बैठकीतही भाग घेण्याची परवानगी नव्हती, परंतु त्यांनी या खेळांमध्ये भाग घेतला.
 
पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक पदक जिंकण्याच्या बाबतीत जपान पहिल्या स्थानावर आहे. आतापर्यंत झालेल्या या खेळांमध्ये केवळ जपान आणि चीननेच अव्वल स्थान पटकावलं आहे.
 
सर्वाधिक विजय मिळवणारे चीन, जपान, दक्षिण कोरिया, इराण आणि भारत हे टॉप-5 देश आहेत.
 
1951 पासून भारताची कामगिरी कशी आहे?
1951, नवी दिल्ली, भारत
 
पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर होता. भारतानं 15 सुवर्ण आणि 16 रौप्य अशी एकूण 31 पदके जिंकली. ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम क्रमवारी आहे.
 
मनिला, फिलीपिन्स
 
दुसऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत पदकतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. भारताने 5 सुवर्ण, 4 रौप्य आणि 8 कांस्य अशी एकूण 17 पदक जिंकली.
 
टोकियो, जपान
 
तिसऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत सातव्या स्थानावर आहे. भारताने 5 सुवर्ण, 4 रौप्य आणि 4 कांस्य अशी एकूण 13 पदक जिंकली.
 
जकार्ता, इंडोनेशिया
 
चौथ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं 10 सुवर्ण, 13 रौप्य आणि 10 कांस्य अशी एकूण 33 पदके जिंकली.
 
बँकॉक, थायलंड
 
भारताने 5व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 7 सुवर्ण, 3 रौप्य आणि 11 कांस्यपदक जिंकले. भारत पाचव्या स्थानावर होता.
 
बँकॉक, थायलंड
 
बँकॉकमध्येच सहाव्या आशियाई क्रीडा स्पर्धा पार पडल्या. भारताला 6 सुवर्ण, 9 रौप्य आणि 10 कांस्य अशी एकूण 25 पदक मिळाली.
 
तेहरान, इराण
 
सातव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं सातवे स्थान पटकावले. भारताने 4 सुवर्ण, 12 रौप्य आणि 12 कांस्य अशी एकूण 28 पदक जिंकली आहेत.
 
बँकॉक, थायलंड
 
या आशियाई खेळांमध्ये भारतानं 26 पदक जिंकली. यामध्ये 10 सुवर्ण, 11 रौप्य आणि 5 कांस्यपदकांचा समावेश आहे.
 
नवी दिल्ली, भारत
 
9व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं पाचवे स्थान मिळवलं. भारताने 13 सुवर्ण, 19 रौप्य आणि 25 कांस्य अशी एकूण 57 पदके जिंकली.
 
सोल, दक्षिण कोरिया
 
10व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं 5 सुवर्ण, 9 रौप्य आणि 22 कांस्य अशी एकूण 37 पदक जिंकली.
बीजिंग, चीन
 
अकराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत 12 व्या स्थानावर म्हणजे टॉप-10 मधून बाहेर राहिला. भारताला केवळ एक सुवर्ण, 8 रौप्य आणि 14 कांस्य अशी एकूण 23 पदक मिळाली.
 
हिरोशिमा, जपान
 
12व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत 8व्या स्थानावर आहे. भारतानं 4 सुवर्ण, 3 रौप्य आणि 16 कांस्य अशी एकूण 23 पदक जिंकली.
 
बँकॉक, थायलंड
 
तेराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं 7 सुवर्ण, 11 रौप्य आणि 17 कांस्य अशी एकूण 35 पदक जिंकली. भारत 9व्या स्थानावर आहे.
 
बुसान, दक्षिण कोरिया
 
14व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत सातव्या स्थानावर आहे. भारतानं 11 सुवर्ण, 12 रौप्य आणि 13 कांस्य अशी एकूण 36 पदक जिंकली.
 
दोहा, कतार
 
15व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं एकूण 52 पदक जिंकली. त्यापैकी 10 सुवर्ण, 16 रौप्य, 26 कांस्यपदक आहेत.
 
ग्वांगझो, चीन
 
16व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं 14 सुवर्ण, 17 रौप्य आणि 34 कांस्य अशी एकूण 65 पदक जिंकली. या खेळांत क्रिकेटचा समावेश झाला, तरीही भारत त्यापासून दूर राहिला.
 
इंचियोन, दक्षिण कोरिया
 
इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण 57 पदक जिंकली आहेत. ज्यामध्ये 11 सुवर्ण, 10 रौप्य आणि 36 कांस्य पदक आहेत. भारत आठव्या स्थानावर होता.
 
जकार्ता, इंडोनेशिया
 
18व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 कांस्य अशी एकूण 69 पदके जिंकली. 1951 नंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची ही सर्वोत्तम कामगिरी होती. भारत आठव्या स्थानावर होता.
 








































Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती