सोमदेव सानिया यांच्या क्रमवारीत घसरण

वेबदुनिया

मंगळवार, 20 सप्टेंबर 2011 (14:45 IST)
भारताचे टेनिसपटू सोमदेव आणि सानिया मिर्झा यांच्या क्रम‍वारीत मोठी घसरण झाली आहे. ताज्या जागतिक क्रमवारित सोमदेव चार तर सानिया सात स्थानांनी घसरली आहे. अमेरिकन ओपनच्या पहिल्या फेरीत एन्डी मरेकडून पराभूत झालेला सोमदेव आता 69व्या स्थानावर आला आहे। गेल्या आठवड्यातील क्रमावारीत 81व्या स्थानावर असलेली सानिया आता 88 व्या क्रमांकावर आली आहे.

वेबदुनिया वर वाचा