अबकारी घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्ली न्यायालयाने मंगळवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ केली. आज या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडूनही केजरीवाल यांना दिलासा मिळालेला नाही. सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी दिल्लीतील सर्व 7 जागांवर मतदान होणार आहे.