विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

मंगळवार, 7 मे 2024 (19:03 IST)
विरोधीपक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यावर केलेल्या आरोपावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली असून विजय वडेट्टीवार हे पाकिस्तानची भाषा बोलत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांची काहीच प्रतिक्रिया नाही. वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी चांगला खरपूस समाचार घेतला आहे. 
 
ते म्हणाले उद्धव ठाकरे वडेट्टीवार यांच्या विधानाशी सहमत आहे का. असं उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावं. वडेट्टीवार उज्ज्वल निकम यांच्यावर आरोप करत आहे. मुंबई हल्ल्यात सामील असलेल्या कसाबला फाशी पर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या कामाचं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उज्ज्वल निकम यांचे कौतुक केले होते. पण त्यांच्यावर विजय वडेट्टीवार आरोप करत आहे. 
 
या प्रकरणात विजय वडेट्टीवारांची चौकशी करायला पाहिजे. ते पाकिस्तानमधील कुणाच्या संपर्कात आहे का? असा प्रश्न देखील फडणवीसांनी मांडला. 
 
हेमंत करकरे हे कसाबच्या गोळीने नव्हे तर एका पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीने मारले गेले असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं होत. हेमंत करकरे हे कसाबच्या गोळीने हुतात्मा झाल्याचं न्यायालयात सिद्ध झालं आहे. 26 नोव्हेंबर हा हल्लाचा कट पाकिस्तान ने रचला असल्याचं फडणवीस म्हणाले. उज्ज्वल निकम यांच्या पाठीशी भाजप आहे आणि हेमंत करकरे आणि शेकडो मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या कसाब सोबत काँग्रेस असल्याचं फडणवीस म्हणाले. काँग्रेचे नेते पाकिस्तानची बाजू घेऊन वक्तव्य करत असून यावर उद्धवजी मौन का आहे. त्यांनी उत्तर द्यावं असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या वर लगावला.

Edited By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती