सेरेनाने घडवला इतिहास, करियरचा 21वा ग्रँडस्लॅम किताब जिंकला

शनिवार, 11 जुलै 2015 (22:37 IST)
विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील सहावं आणि एकूण २१वं ग्रॅंड स्लॅम विजेतेपद सेरेना विल्यम्सच्या नावावर झाले आहे. विम्बल्डच्या अंतिम सामन्यात सेरेनाने गारबीनचा ६-४, ६-४ असा पराभव केला. .   
 
सेरेना 33 वर्ष आणि 289 दिवसांच्या वयात हा किताब जिंकून मार्टिना नवरातिलोवाला मागे सोडून ओपन युगात महिला एकल ग्रँडस्लॅम जिंकणारी सर्वात जास्त वयाची खेळाडू बनली.  
 
या अमेरिकी खेळाडूने या सोबत एकाच वेळेस चारी ग्रँडस्लॅम किताब आपल्या नावावर करून ‘सेरेना स्लॅम’पण पूर्ण केला. या अगोदर    सेरेनाने 2002-03मध्ये ही उपलब्धी मिळवली होती.  
 
या वर्षी ऑस्ट्रेलियाई ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनचा किताब जिंकणारी सेरेना आता अमेरिकी ओपनचा किताबपण आपल्या नावावर करून कॅलेंडर ग्रँडस्लॅम पूर्ण करण्याच्या तयारीत उतरेल. सेरेना जर हे करण्यास यशस्वी ठरली तर ती 1998मध्ये स्टेफी ग्राफनंतर कँलेंडर स्लॅम पूर्ण करणारी पहिली महिला खेळाडू ठरेल.  
 
सेरेनाने विजयानंतर म्हटले की, 'मला फारच आनंद होत आहे. गारबाइन फार छान खेळली. मला हे ही कळले नाही की मॅच संपला आहे कारण शेवटी ती फार मोठी टक्कर देत होती. ती लवकरच हे किताब जिंकेल. मला या गोष्टीचा आनंद होत आहे की हा सामना फारच शानदार राहीला.' (भाषा)

वेबदुनिया वर वाचा