रॉजर फेडरर तिसर्‍या फेरीत

वेबदुनिया

मंगळवार, 13 मार्च 2012 (14:40 IST)
स्वीत्झर्लंडचा तिसरा मानांकित टेनिसपटू रॉजर फेडरर याने वाइल्ड कार्डधारक डेनिस कुल्हा याच्यावर 6-4, 6-1 अशी सरळ सेटम ध्ये मात करनू तिसरी फेरी गाठली. या सामन्यात प्रकृती बरी नसतानाही उतरलेल्या फेडररने 57 मिनिटात विजय मिळवला.

तिसर्‍या फेरीत त्याची गाठ कॅनडाच्या मिलोस राओनिक याच्याशी पडणार आहे. राओनिकने दुसर्‍या फेरीत कार्लोस बेरलॉक याला 6-4, 6-2 असे पराभूत केले.

वेबदुनिया वर वाचा