फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ४ जणांचा मृत्यू तर अनेक जखमी

मंगळवार, 1 जुलै 2025 (12:24 IST)
तामिळनाडूतील शिवकाशी येथे मंगळवारी सकाळी एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक कामगार जखमी झाले आहे.
ALSO READ: हिमाचलच्या मंडीमध्ये ढगफुटी, घरे वाहून गेली तर अनेक जण बेपत्ता
मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूतील शिवकाशी जवळील एका फटाक्याच्या कारखान्यात मंगळवारी मोठा स्फोट झाला. या अपघातात किमान चार जणांचा मृत्यू झाला आणि पाच जण जखमी झाले. चिन्नकमानपट्टी येथील एका कारखान्यात हा स्फोट झाला. जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विरुधुनगर जिल्ह्यातील एसपी म्हणाले, "शिवकाशी जवळील चिन्नकमानपट्टी येथील एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला आणि पाच जण जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी विरुधुनगर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ALSO READ: एलोन मस्क यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना उघडपणे इशारा; म्हणाले- 'मी दुसऱ्याच दिवशी नवीन पक्ष स्थापन करेन'
Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती