भुतियाला दोन आठवडे विश्रांतीचा सल्ला

भाषा

शनिवार, 21 नोव्हेंबर 2009 (15:10 IST)
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार बाईचुंग भुतियाला दोन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. गोव्यातील मडगावमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय संघाच्या शिबिरात त्याला शुक्रवारी (ता.20) दुखापत झाली होती.

अखिल भारतीय फुटबाल महासंघने (एआयएफएफ) आशिया कप स्पर्धेची तयारी गोव्यात सुरु केली आहे. या‍ शिबिरातील दुखापतीनंतर भुतियाने विशेषज्ञांचा सल्ला घेतला. त्याची दुखापत मोठी नाही. यामुळे त्याला दोन आठवडे विश्रांती करण्याचा सल्ला देण्यात आला. यामुळे तो कोलकात्यात परत जाणार असून विश्रांतीनंतर प्रशिक्षण शिबिरात पुन्हा दाखल होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा