फिफा वर्ल्डकप 2014 साठी पाकिस्तानी फुटबॉल!

शुक्रवार, 13 जून 2014 (12:26 IST)
ब्राझीलमध्ये एका रंगारंग सोहळ्याने फुटबॉलचा महासंग्राम अर्थात फिफा विश्वचषकाला प्रारंभ झाला आहे. विशेष म्हणजे सलामीच्या लढतीत क्रोएशियावर 3-1 अशी मात करून यजमान ब्राझीलने पहिला विजय मिळवला आहे. तुम्हाला माहित आहे का? फिफामध्ये वापरले जाणारे फुटबॉल हे पाकिस्तान तयार झालेले आहेत.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातल्या सियालकोटमध्ये फुटबॉल तयार केले जात आहेत. ब्राझिलच्या फिफा विश्वचषकासाठी तब्बल साठ लाख फुटबॉल पुरवण्याची ऑर्डर सियालकोटमधल्या क्रीडासाहित्याच्या इंडस्ट्रीजला मिळाली आहे.

पाकिस्तानच्या सियालकोटी फुटबॉल्सचे वैशिष्ट्य म्हणजे या चेंडूंची बांधणी हाताने केली जाते. फुटबॉल हाताने शिवून तयार केले जाते. पाकिस्तानच्या दृष्टीने अभिमानाची बाब म्हणजे चीनच्या मशिन मेड फुटबॉल्सना शर्यतीत मागे टाकून सियालकोटी फुटबॉल्सनी फिफा विश्वचषकासाठी अदिदास कंपनीचे कंत्राट मिळवले. अदिदासने या फुटबॉल्सचे ब्राझुका असे नामकरण केले आहे.

पाकिस्तानमधील हातान शिवलेल्या फुटबॉल जगात सर्वाधिक मागणी आहे. जगभरात वापरण्यात येणारे 70टक्के फुटबॉल्स पाकिस्तानातील आहेत. 

वेबदुनिया वर वाचा