पेस धोकेबाज आहे! भूपतीचा आणखी एक आरोप

वेबदुनिया

मंगळवार, 19 जून 2012 (11:32 IST)
WD
लंडन ऑलिम्पिकसाठी महेश भूपती आणि लिएंडर पेसची जोडी पाठविर्याचे ठरविल्यानंतर भारतीय टेनिसमध्ये उसळलेला वाद संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत नसून, सोमवारी भूपतीने पेसवर आणखी एक आरोप करताना तो धोकेबाज असल्याचे म्हटले आहे. पेस अनेकदा आपल्या सोबत खोटेपणाने वागला आणि नोव्हेंबर 2011ला एका स्पर्धेदरम्यान आप ल्याला कसलीही सूचना न देता त्याने जोडीडारही बदलला, असे भूपतीने सांगितले.

भूपतीने अखिल भारतीय टेनिस संघटना वरही हल्ला केला आणि एआयटीनेच लंडन ऑलिम्पिकमध्ये पुरुष दुहेरीची केवळ एकच जोडी पाठविण्याचा निर्णय घेऊन वादाला जन्म दिल्याचेही म्हटले.

वेबदुनिया वर वाचा