रशियाने अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला औपचारिक मान्यता देण्याची घोषणा केली आहे. गुरुवारी या निर्णयाबाबत, रशियन परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, त्यांना अफगाणिस्तानचे नवनियुक्त राजदूत गुल हसन हसन यांच्याकडून प्रमाणपत्रे मिळाली आहेत.
अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला औपचारिक मान्यता देणारा पहिला देश होण्याबाबत , रशियन परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की अफगाण सरकारला अधिकृत मान्यता मिळाल्याने दोन्ही देशांमधील 'उत्पादक द्विपक्षीय सहकार्याला' चालना मिळेल.
रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या घोषणेनंतर, अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या निर्णयाचे ऐतिहासिक पाऊल म्हटले. तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी या निर्णयाचे स्वागत केले आणि ते 'इतर देशांसाठी एक चांगले उदाहरण' असल्याचे म्हटले.