श्रावण महिन्यात महामृत्युंजयमंत्राची 13 वैशिष्ट्ये जाणून घेऊया..

सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (08:16 IST)
श्रावणात महामृत्युंजयाच्या मंत्राचे जप केल्याने अकाल मृत्यू टाळता येते. चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते. या महिन्यात हे मंत्र तब्बल 10 पटीने जास्त चांगले फळ देतं.
महामृत्युंजय मंत्र :
 
ॐ ह्रौं ज्यू सः। ॐ भूः भुवः स्वः। ॐ त्र्यंबक यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम्‌। उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्‌। स्वः भुवः भूः ॐ। सः जूं ह्रौं ॐ॥
 
अंघोळ करताना आपल्या अंगावर पाणी घालताना या मंत्राचे जप केल्याने आरोग्य लाभ मिळतात.
दुधाकडे बघत या मंत्राचे जप करून नंतर ते दूध प्यायल्याने तारुण्या टिकून राहण्यास मदत मिळते.
या मंत्राच्या जप केल्याने अनेक अडथळे दूर होतात, म्हणून नेहमीच या मंत्राचे श्रद्धेनुसार जप करावे.
 
पुढील सर्व परिस्थिती असल्यास या मंत्राचे जपा केले जाते.
 
1 ज्योतिष्यानुसार जर जन्म, महिना, गोचर आणि दशा, अंतर्दशा, स्थूलदशा इत्यादीमध्ये ग्रहपीडा असल्यास.
2 कोणत्याही जीवघेण्या आजाराने ग्रस्त असल्यास.
3 कुठल्याही खटल्यात अडकल्यावर.
4 कॉलरा-प्लेग सारख्या साथीच्या आजाराने लोकं मरत असल्यास हा जप करावा.
5 राज्य किंवा संपत्ती जाण्याची शक्यता असल्यास.
6 पैशांचे नुकसान होतं असल्यास.
7 पत्रिका मिळवताना नाडीदोष, षडाष्टक आढळल्यास.
8 राजभय असल्यास.
9 मन धर्म कर्मापासून अलिप्त झाले असल्यास.
10 राष्ट्राचे विभक्तीकरण झाले असल्यास.
11 परस्पर क्लेश होतं असल्यास.
12 त्रिदोषामुळे आजार होतं असल्यास.
13 नैसर्गिक आपत्ती आली असल्यास.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती