श्रावणात का आवडतो हिरवा रंग, जाणून घेऊ या हिरव्या रंगाचे महत्त्व..

शनिवार, 16 जुलै 2022 (09:50 IST)
डॉ. छाया मंगल मिश्र
आपण आपल्या आजूबाजूस असंख्य वस्तू बघत असतो, जे कोणत्या न कोणत्या रंगाने मिसळून बनविले जातात कारण रंगांचे आपल्या जीवनात विशेष महत्त्व आहेत, काही रंग असे देखील असतात जे बघितल्यावर आपल्या मनाला आनंदित करतात. हिरवा रंग देखील अश्या प्रकाराच्या रंगापैकी एक आहे, जे निसर्गामध्ये निळ्या रंगा नंतर सर्वात जास्त प्रमाणात आढळतो. याला दोलायमान रंगात मोजलं जातं .
 
हिरवा रंग हे एक दुय्यम रंग आहे हा रंग दोन प्राथमिक रंगांनी मिळून बनलेला आहे. हिरवा रंग पिवळा आणि निळ्या रंगाच्या मिश्रणाने बनलेला आहे. पांढऱ्या आणि काळ्या सारख्या अतिरिक्त रंगाला जोडून अजून हिरव्या रंगाची निर्मिती केली जाऊ शकते.
 
हिंदू धर्मात श्रावणाच्या पावित्र्य महिन्याचे विशेष महत्त्व आहे. श्रावण सुरू होतातच सगळी कडे हिरवेगार दिसू लागते. या महिन्यात सवाष्ण बायका हिरव्या रंगाचे वस्त्र आणि बांगड्या घालून नटून थाटून शंकराच्या देऊळात जातात. श्रावण येतातच सगळी कडे हिरवेगार होऊन जात. हा संपूर्ण महिना स्वतःला निसर्गाशी जोडण्याचा खास महिना आहे. म्हणून शंकराला पाणी घालून आम्ही स्वतःला निसर्गाशी जोडतो. अश्या प्रकारे भाविक हिरवा रंग परिधान करून स्वतःला निसर्गाशी जोडतात, त्याचा परिणाम त्यांचा नशिबावर पडतो. शंकराच्या देऊळात देवाच्या दर्शनास लोकांची प्रचंड गर्दी होते. श्रावण लागतातच बाजारपेठेत दुकाने हिरव्या बांगड्यांनी सजलेले दिसतात जेथे बायका हिरव्या बांगड्या खरेदी करताना दिसून येतात.
 
आम्ही जीवनातील सर्व सकारात्मक बाबी जसे - आरोग्य, शक्ती, संपत्ती, समतोल, विकास इत्यादी मध्ये हिरवा रंग वापरणे शुभ मानतो. सर्जनशीलता आणि उत्पादकतेला वाढविण्यासाठी देखील हिरव्या रंगाची विशेष भूमिका असते. हृदयचक्राचे रंग देखील हिरवे आहे. हृदय चक्र जे आपल्या छातीच्या मध्यभागी असतो आणि हे चक्र हृदय, फुफ्फुसे, रक्ताभिसरण, कार्डियक प्लेक्सस(Cardiac Plexus) इत्यादी सह संपूर्ण छातीशी जोडलेले आहेत. हृदय चक्र शारीरिक आणि आध्यात्मिक जगामधील अंतर कमी करते. हृदय चक्र मोकळं झाल्यावर माणसाला प्रेम, सहानुभूती आणि करुणेचा अनुभव होऊ लागतो. हृदय चक्र हिरव्या रंगाचे असते, ज्याला अनाहत म्हणतात.
हिरव्या रंगाचा स्वामी ज्योतिषाचा राजपुत्र ग्रह बुध आहे जो पृथ्वीचा प्रतीक आहे, हा रंग हसू, तारुण्य आणि आशाशी निगडित आहे. हिरवा रंग वसंत ऋतू, आशा, निसर्ग,
नवं जीवन, परिश्रम आणि तारुण्याचा आहे. हिरवा रंग आवडणारे लोकं वृद्धावस्थेचा तिरस्कार करतात. हे लोकं तत्परतेने काम करतात. स्वभावाने हुशार, व्यावसायिक क्षमतांसह, प्रखर वक्ता, जुगार आणि सट्ट्यात यांची आवड असणारे असतात.
हिरव्या रंगाच्या कमतरतेमुळे मानसिक रोग, हिस्टीरिया आणि मज्जातंतू विकार उद्भवतात. मानसिक दृष्ट्या वेडे लोकं हिरव्या वातावरणात चांगले राहतात जसे हिरव्या रंगाची खोली, हिरव्या रंगाची चादर, हिरव्या रंगाचे पडदे हिरवा रंग आरामदायी आणि शांत असतो. हिरवा रंग असल्यामुळे आपल्या शरीराची पीयुष ग्रंथी संदीप्त होते.
 
स्नायूंना आराम मिळतो आणि रक्तामध्ये हिस्टॅमिन (Histamine) ची पातळी वाढते, ज्यामुळे ऍलर्जीच्या लक्षणांमध्ये कमतरता येते आणि रक्तवाहिन्या, गुळगुळीत स्नायूंच्या संकुचित होण्यास मदत होते. थोडक्यात, हिरवा रंग शांतता, तणाव पासून सुटका देण्यास आणि उत्साह वाढविण्यात साहाय्य असतो.
 
हे अभ्यासाची क्षमता आणि सर्जनशीलते मध्ये वाढ करतो. बुधाचा रंग असल्यामुळे हे रंग अभ्यासाच्या खोलीत अभ्यासासाठी चांगला मानला जातो. उत्तरेकडील असलेल्या खोलीमध्ये हा रंग योग्य असतो. शरीरात हिरवा रंग वाढविण्यासाठी तांब्याच्या अंगठीत हिरवा पन्ना किंवा पाचू घालू शकता. बुध चांगले करण्यासाठी हिरव्या रंगाचे वस्त्र धारण करावे. हा रंग शांती आणि संतुलनाची भावनेला निर्माण करतं. मेंदूच्या नसांना तीक्ष्ण करतं. या रंगाला नैसर्गिक रंग देखील म्हणतात. जे मानसिक संतुलन ठीक करण्यास मदत करतं.
 
कुराणात याला स्वर्गाशी जोडले आहे. ऐतिहासिक फातिमी खिलाफतच्या बॅनर मध्ये देखील हिरवा रंग वापरला आहे. आज, हिरव्या रंगाला इस्लामच्या प्रतिकात्मक रूपात अनेक राष्ट्रीय झेंड्यात (अफगाणिस्तान, अल्गेरिया, अजरबैजान, कोमोरास, इराण, मॉरीटोनिया,पाकिस्तान, सऊदी अरब इत्यादी)मध्ये वापरलं जातं. इस्लामात हिरवा रंग पृथ्वीशी जुळून इस्लाम धर्माचे पालन करण्यास परवानगी देतं. पैगंबर मुहंमदाला इस्लाम मध्ये पृथ्वीसाठी अल्लाहचे दूत मानले गेले आहे, जो सर्व प्राणी आणि पर्यावरणीय प्रणालीच्या मध्य समानतेचे प्रतीक होते.
 
हिरवा रंग संतुलन, निसर्ग, वसंत, आणि पुनर्जन्माचे प्रतीक मानला गेला आहे. अमेरिकेत ग्रीन पार्टी(Green Party)पर्यावरणीय आणि प्रगतिशील कारणांवर अवलंबून आहे. जपान मध्ये हिरव्या रंगाला शाश्वत जीवनाचे रंग मानले जाते. इस्लाममध्ये याला पवित्र रंग मानले गेले आहेत.जे सन्मान आणि पैगंबर मुहंमदाचे प्रतिनिधित्व करतं.
 
हिरवा रंग आयर्लंडमध्ये प्रतीकांचा आहे जे मोठ्या हिरव्यागार टेकड्यांसह आयर्लंडच्या संरक्षक संत, सेंट पेट्रिकचे प्रतिनिधित्व करतं. चीन मधील हरिताश्म दगड पुण्य आणि सौंदर्यतेचे प्रतिनिधित्व करतं. पुर्तगाल मध्ये ह्याला आशेचा रंग मानला जातो. अश्या प्रकारे वेगवेगळ्या देशात ह्याला कोणत्या न कोणत्या स्वरूपात विशेष महत्त्व दिलं गेलं आहे.
 
गडद हिरवा रंग पुरुषत्व दर्शवितो आणि हलका हिरवा रंग स्त्रीत्व दर्शवितो. हिरव्या रंगाचे विविध प्रकाराचे परिणाम आपल्याला बघायला मिळतात. गडद हिरव्या रंगाला संपत्तीशी जोडलं जातं, विशेषतः अमेरिकेत मुद्रांच्या कागदाचा रंग देखील हिरवा आहे. संपत्तीशी निगडित असल्याने हिरव्या रंगाला लोभ, मत्सर आणि महत्त्वाकांक्षेचे प्रतीक देखील मानलं जातं.
 
चमकदार हिरवा रंग आशा आणि सुरक्षिततेशी निगडित असतं. हा रंग स्थैर्यता आणि सहनशक्तीचे प्रतिनिधित्व करतं, तरी हा रंग निसर्गाशी जुळलेला आहे. चमकदार हिरवा रंग बहुदा झाड आणि पर्यावरणास उपयुक्त मानलं जातं, म्हणूनच विपणनासाठी वेगवेगळ्या सामानाच्या पॅकेजिंग(Packaging) मध्ये देखील या रंगाचा वापर केला जातो.
 
पिवळटसर हिरव्या रंगात पिवळ्या रंग जेवढा जास्त हिरवा असतो तो तेवढेच जास्त सकारात्मकतेचे प्रतीक असते. या रंगाला बऱ्याचदा व्यवसायाचे प्रतिनिधित्व करणारा देखील मानतात. तर काही लोकं ह्याला मत्सराशी जोडतात.
 
ऑलिव्ह हिरवा रंग निसर्गाशी निगडित आहे. हा रंग शांतीचे प्रतिनिधित्व करतो. अक्षरशः: बघितल्यावर ऑलिव्ह ही एक नैसर्गिक वनस्पती आहे, जी हिरव्या रंगाची असते आणि शांततेशी निगडित असते.
 
बऱ्याचशा क्षेत्रात हिरव्या रंगाचे विशेष महत्त्व आहेत. क्रीडेच्या क्षेत्रात हिरवा रंग ऑटो रेसिंग (Auto Racing)मध्ये रेस सुरू करण्यासाठी किंवा पुन्हा सुरू करण्यासाठी संकेतांच्या रूपात वापर करण्यात येतं. जुडो (Judo)मध्ये ग्रीन बेल्ट हिरव्या झाडांचे प्रतीक आहे. ज्या प्रमाणे एक हिरवे झाड सर्वात उंच सजीव वस्तू आहे, त्याच प्रकारे ज्ञानाचा शोध आपण स्वतःच घेतला पाहिजे जेणे करून आपल्याला उच्च लक्ष्याची प्राप्ती मिळू शकेल.
 
हिरवा रंग सुप्रसिद्ध ब्रँडचे देखील प्रतीक आहे ज्यामध्ये एच, एन्ड आर ब्लॉक (H&R Block), बीपी (BP), हेनेकेन (Heineken), स्टारबक्स (Starbucks), दी मास्टर्स गोल्फ टूर्नामेंट (The Masters Golf Tournament), रोलिंग रॉक (Rolling Rock), गार्नियर फ्रुक्टिस (Garnier Fructis) मुख्य आहेत.
 
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या देशाच्या तिरंग्यामध्ये देखील ह्याचा समावेश आहे. जे आपल्याला जीवापाड आवडतो. जो आपल्या देशाचा मान, अभिमान, वैभव आहे. हे आपल्या भारतमातेच्या पदराची सावली आणि आपल्या भारतदेशाच्या डोक्यावरचे मुकुट आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती