मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम 14 वर्षाच्या वनवास काळ दरम्यान जेव्हा जाबालि ऋषींना भेटायला नर्मदा तटी आले तेव्हा हे स्थळ पर्वताहून वेढलेले होते. रस्त्यात महादेवही त्यांना भेटण्यासाठी आतुर होते परंतू देव आणि भक्तामध्ये ते येऊ इच्छित नव्हते. प्रभू रामाच्या पायाला दगड टोचू नये म्हणून महादेवाने त्यांना लहान गोल आकार दिला म्हणूनच कंकडा-कंकडात शंकर असल्याचे म्हणलं जातं.