शिधा म्हणजे काय? काय आणि कोणाला द्यावा? योग्य पद्धत जाणून घ्या
गुरूवार, 11 सप्टेंबर 2025 (13:28 IST)
श्राद्ध पक्षात काही वेळा घरच्या परिस्थितीमुळे श्राद्ध विधी करणे शक्य होत नाही. अशावेळी पर्यायी मार्ग म्हणून शिधा देणे मान्य आहे.
शिधा म्हणजे काय?
शिधा म्हणजे श्राद्धाचे जेवण किंवा पिण्याचे पाणी/धान्य/साहित्य पितरांच्या निमित्ताने ब्राह्मणाला किंवा योग्य पात्र व्यक्तीस अर्पण करणे. हे पिंडदान किंवा संपूर्ण विधी शक्य नसेल तर केलेले साधे पण अर्थपूर्ण कृत्य आहे. शिधा यात जेवणासाठी लागणाऱ्या वस्तू किंवा काही विशिष्ट पदार्थांचे मिश्रण, जे दान किंवा पित्र्यांना अर्पण करण्यासाठी वापरले जाते.
शिधा देण्याची पद्धत:
आमश्राद्ध: जेव्हा विधिवत श्राद्ध करणे शक्य नसते, तेव्हा आमश्राद्ध करतात. यामध्ये शिधा देऊन श्राद्धाचे इतर विधी पूर्ण केले जातात.
हिरण्यश्राद्ध: यामध्ये फक्त दक्षिणा देऊन (पैशांच्या स्वरूपात) श्राद्ध केले जाते, आणि पिण्डदान केले जात नाही.
शिधा देण्याचे पर्याय: श्राद्ध करण्याऐवजी तुम्ही पुरणपोळीसारखा नैवेद्य तयार करून तो एका ब्राम्हणाला किंवा गरजू व्यक्तीला देऊ शकता. यामागील उद्देश पित्र्यांबद्दल आदर व्यक्त करणे आणि त्यांना संतुष्ट करणे हा असतो.
मिठाई किंवा गोड पदार्थ – पिठले-लाडू, खीर, पुरणपोळी (परंपरेनुसार).
फळे – केळी, सफरचंद, पेरू किंवा हंगामी फळे.
दूध-दही-तूप-तेल
पान-फूल, अगरबत्ती, सुपारी
दक्षिणा (पैसे)
सोयीप्रमाणे कापड
कोरडा शिधा देयचा असल्यास अन्नधान्य - गहू, तांदूळ, डाळी (तूर डाळ, मूग डाळ इत्यादी) याह मसाले जसे तिखट, हळद, धणे, जिरे यांसारखे मूलभूत मसाले यांसारख्या पदार्थांचा समावेश असावा.
शिधा कोणाला द्यावा?
परंपरेनुसार ब्राह्मणाला शिधा देतात.
काही ठिकाणी विधवा, गरजू किंवा पितृकर्म करणाऱ्या गृहस्थाला देखील शिधा दिला जातो.
जर ब्राह्मण उपलब्ध नसेल तर गरजूंना, गरीबाला किंवा गायीला देखील शिधा अर्पण करता येतो.
शिधा देण्याची वेळ
पितृकर्म सकाळी 10 ते दुपारी 1 या कालावधीत (अपरा काला / मध्यान्ह काळात) करणे श्रेष्ठ मानले जाते.
शिधा देण्यासाठी योग्य वेळ आहे.
शिधा दिल्यानंतर स्वतःचे जेवण करतात.
जर तुम्ही पूर्ण श्राद्ध करू शकत नसाल, तर शिधा (अन्न) देणे हा एक चांगला पर्याय आहे. हे पित्र्यांना संतुष्ट करण्याचा आणि त्यांच्याबद्दलची श्रद्धा व्यक्त करण्याचा एक सोपा मार्ग आहे.