ऐन सणासुदीच्या काळात आनंदाचा शिधा योजना अखेर बंद

मंगळवार, 11 मार्च 2025 (14:49 IST)
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 2022 मध्ये सुरु करण्यात आलेली आनंदाचा शिधा योजना अखेर बंद करण्यात आली आहे. या योजनेमुळे राज्यातील कोट्यावधी लोकांना या योजनेचा लाभ मिळत होता. राज्याच्या तिजोरीवर भार पडल्यामुळे आता ही योजना बंद करण्यात आल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. 
ALSO READ: शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी दिली प्रतिक्रिया
या योजनेअंतर्गत रेशनकार्डधारकांना, 1 किलो रवा, 1 किलो साखर, 1 लिटर पामतेल आणि 1 किलो चणाडाळ मिळायची.आता ही योजना राज्यातील तिजोरीवर अतिरिक्त भार पडल्यामुळे बंद करण्यात येत आहे. ही योजना बंद केल्यामुळे आता रेशनकार्डधारकांना सणासुदीला सरकारकडून मिळणारे खाद्यपदार्थ मिळणार फक्त 100 रुपयांत मिळायच्या आता त्यांना या वस्तू बाजारातून खरेदी करावे लागणार आहे. 
ALSO READ: लाडक्या बहिणींना मोठा धक्का
आनंदाचा शिधा या योजनेत रेशनकार्डधारकांना सणासुदीच्या काळात रेशनच्या दुकानातून 100 रुपयांमध्ये चणाडाळ, साखर, रवा, पामतेल मिळत असायचे. तसेच कोट्यावधी लाभार्थींना या किटचे वाटप केले जात होते. प्रत्येक सणाला 350 कोटींची तरतूद करण्यात आली होती. आता ही योजना बंद केल्यामुळे कोट्यावधी लाभार्थींना फटका बसला आहे. 
2022 मध्ये ही योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत गुढीपाडवा, गणपती, दिवाळी आणि 2024 मध्ये अयोध्यातील श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने आनंदाचा शिधा वाटप केला. पण आता ही योजना बंद करण्यात येत असल्याची चर्चा सुरु आहे. 
ALSO READ: मुख्यमंत्री फडणवीस सरकारवर हल्लाबोल करीत उद्धव ठाकरे अर्थसंकल्प बोगस असल्याचे म्हणाले
गेल्या निवडणुकीत महायुती सरकारने अनेक योजनांची घोषणा केली आणि अर्थसंकल्पात अनेक योजनांसाठी निधीचे वाटप करण्यात आले. मात्र आनंदाचा शिधा या योजनेसाठी काही तरतूद केल्याचे समोर आले नसल्याने ही योजना बंद झाल्याची चर्चा होत आहे. 
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती