'आनंदाचा शिधा' घोटाळा प्रकरण : हिंमत असेल तर चौकशी करा-काँग्रेसचे आव्हान

शनिवार, 14 सप्टेंबर 2024 (10:12 IST)
महाराष्ट्रातील जनतेला सणासुदीच्या निमित्ताने स्वस्त दरात रेशन मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी 'आनंदाचा शिधा' योजना पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
 
लोंढे म्हणाले की, 'आनंदाचा शिधा' योजनेत मोठा भ्रष्टाचार होत आहे. तसेच महाराष्ट्रातील 70 ते 80 टक्के भागात या योजनेचा लाभ मिळत नसून अन्नपदार्थ निकृष्ट दर्जाचे आहे. या गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने समिती स्थापन करावी.
 
यापूर्वीही आरोप झाले होते- गणेश चतुर्थी आणि दिवाळी यांसारख्या सणांच्या निमित्ताने सरकार या योज़ने  अंतर्गत जनतेला एक किलो रवा, एक किलो हरभरा डाळ, एक किलो साखर आणि एक लिटर खाद्यतेल इत्यादी खाद्यपदार्थ 100 रुपयांना पुरवते. तसेच आनंदाचा शिधा योजना यापूर्वी सप्टेंबर 2023 आणि फेब्रुवारी 2024 मध्येही वादात सापडली होती. पाथर्डी तालुक्यात फेब्रुवारी 2024 मध्ये या योजनेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती