छत्रपती शिवाजी महाराज जयंती : 10 खास गोष्टी

बुधवार, 31 मार्च 2021 (10:08 IST)
छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाबाई ह्याचे पुत्र होते. त्यांची जन्मस्थळी पुण्याच्या नजीक शिवनेरी गड येथे आहे.
 
त्यांनी त्यांचे बालपण त्यांची आई राजमाता जिजाऊ ह्यांच्या मार्गदर्शनाखाली घालवले. कोंडवदेवांच्या संरक्षणाखाली छत्रपती शिवाजी राजे ह्यांना सर्वप्रकाराच्या सांस्कृतिक आणि राजकारणाच्या शिक्षणाचे धडे देखील दिले आणि त्यामध्ये पारंगत देखील केले. त्या काळात छत्रपती शिवाजी महाराज संत रामदास स्वामींच्या सानिध्यात राहून पूर्णपणे राष्ट्रवादी, कर्तव्यपरायण आणि कष्टकरी योद्धा बनले.
 
बालपणातच छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सवंगडीना घेऊन त्यांचे नेतृत्व करून युद्धाचे खेळ आणि गड जिंकण्याचे खेळ खेळायचे. तारुण्यावस्थेत येतातच त्यांचे बालपणीचे खेळ खरोखरच शत्रूंवर हल्ला करून त्यांचे गड जिंकणारे होऊ लागले.
 
छत्रपती शिवाजी महाराजांवर मुस्लिम विरोधी असल्याचा आरोप करण्यात आला होता. परंतु हे खरे नाही कारण त्यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सैनिक म्हणून तर होतेच, परंतु अनेक मुस्लिम सरदार आणि सुबेदार देखील होते.
 
छत्रपती संभाजी ह्यांना जगातील प्रथम बालसाहित्यकार मानले जाते. वयाच्या 14 व्यावर्षी बुद्धभूषणम(संस्कृत) नायिकाभेद,सातसतक, नखशिख( हिंदी) इत्यादी ग्रंथ लिहिणारे छत्रपती संभाजी राजे हे जगातील पहिले बालसाहित्यकार होते.
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाढत्या वैभवाने घाबरलेला बिजापूरचा राजा अदिलशहा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना अटक करू शकला नाही, तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांना म्हणजे छत्रपती शहाजी महाराजांना अटक करून तुरंगात टाकले. छत्रपती शिवाजी महाराजांना हे कळल्यावर ते फार संतापले आणि त्यांनी नीतीने आणि सामर्थ्याने छापामारून लवकरच आपल्या वडिलांना त्याचा ताब्यातून सोडविले. 
 
बिजापुराचा राजाने छत्रपती शिवाजी महाराजांना जिवंत किंवा मृत पकडून आणण्याचा आदेश दिला. आपल्या धूर्त सेनापती अफजल खान ह्याला बंधुत्वाचे खोटे नाटक आणि कट कारस्थान रचून छत्रपती शिवाजी महाराजांना गळेभेट करून मारण्याचा डाव रचला. परंतु तो स्वतः महाराजांच्या हातून त्यांनी लावलेल्या वाघनखांमुळे ठार मारला गेला. आपल्या सेनापतीला मारलेले बघून अफजल खानच्या सैन्या ने पळ काढला.
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले स्वतःचे एक सैन्य तयार केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या वेळी त्यांच्या सैन्यात 30 -40 हजार नियमित आणि कायमस्वरूपी नेमणूक केलेले घोडेस्वार, एक लाख पादचारी आणि 1260 हत्तींचा समावेश होता.
 
मराठा सैन्य यंत्रणेची वैशिष्ट्ये होते किल्ले. कथावाचकांच्या मते, छत्रपती शिवाजी महाराजांकडे एकूण 250 किल्ले होते. या किल्ल्यांच्या दुरुस्तीवर ते खूप खर्च करायचे.
 
वीर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची कुळदेवी आई तुळजा भवानी आहे. महाराज नेहमी त्यांचीच उपासना करायचे. अशी आख्यायिका आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना खुद्द देवी आईने प्रगट होऊन तलवार दिली होती. सध्या ही तलवार लंडन च्या संग्रहालयात ठेवलेली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती